Big Breaking : भाजपचे आमदार लांडगेंना खंडणीसह जीवे मारण्याची धमकी!
Mahesh Landge : तीस लाख रुपयांची खंडणी द्या नाही तर… असे म्हणत उद्योगनगरीतील भाजपचे नेते तथा भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. आमदार लांडगे यांनी सुरू केलेल्या परिवर्तन या हेल्पलाईनवर ही धमकी देण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील भाजपच्या मोठया नेत्यांना फोनवरून खंडणी तसेच जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. मात्र, यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
खरंतर राज्याचे गृहमंत्री पद असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याच भाजपच्या मोठ्या नेत्यांना गेल्या महिनाभरापासून धमक्या सत्र सुरू आहे. मात्र, अद्याप याबाबत कठोर कारवाई होताना दिसत नाही.
महिनाभरापूर्वी भाजपच्याच मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने एका बिल्डरकडे ३ कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. त्यामुळे पुणे शहरात खळबळ उडाली होती.
गेल्या आठ दिवसांपूर्वी भाजपचे पुणे महापालिकेतील माजी गटनेते गणेश बिडकर यांना २५ लाख रुपयांची खंडणी द्या म्हणून खुलेआम फोनवर धमकी देण्यात आली होती. तर आता पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना ३० लाख रुपये द्या. नाहीतर जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.