Girish Bapat : बापट कायम पुणेकरांच्या स्मरणात राहतील; धंगेकरांनी जागवल्या आठवणी

  • Written By: Published:
Girish Bapat : बापट कायम पुणेकरांच्या स्मरणात राहतील; धंगेकरांनी जागवल्या आठवणी

भाजपचे ज्येष्ठ नेते व पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजाराशी झूंज देत होते. पण अखेर त्यांची प्राणज्योत आज मालवली आहे. बापट यांच्या निधनानंतर अनेक नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.नुकतेच महिनाभरापूर्वी कसबा पेठ पोटनिवडणुकीमध्ये निवडून आलेले रवींद्र धंगेकर यांनी देखील त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

गिरीश बापट हे सर्वसमावेशक नेते होते. पुण्याच्या जडणघडणीमध्ये त्यांचे योगदान मोठे आहे. सर्व विरोधी पक्षातील नेत्यांशी त्यांचे संबंध होते. पुण्यामध्ये काम करताना त्यांनी सर्व विरोधकांना बरोबर घेऊन कामे केली आहेत. त्यामुळे त्यांची आठवण पुणेकरांना व राजकीय कार्यकर्त्यांना कायम राहील, अशा शब्दात धंगेकर यांनी बापटांच्या विषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

कसब्याचे किंगमेकर हरपले; गिरीश बापटांना राजकीय नेत्यांकडून श्रद्धांजली

पुणे शहराने एक चांगला सामाजिक स्तर असलेला नेता गमावलेला आहे. त्यामुळे मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. आमदार झाल्यावर मी त्यांना भेटलो होते तेव्हा त्यांनी मला नियोजनप्रमाणे काम केल्यास यशस्वी होशील असा सल्ला दिला होता, असेही त्यांनी सांगितले.

Girish Bapat : रोहित टिळक विरोधात, राहुल गांधी प्रचाराला आले, तरीही बापटांनी गड राखला

दरम्यान, बापट यांच्या जाण्यावरुन अनेक नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.  खासदार गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. चार दशकांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत बापट यांनी नेहमीच सर्वसमावेशक भूमिका घेत राजकीय प्रवास केला. पुण्यातील लोकांच्या मनात पक्के स्थान निर्माण करत त्यांनी पुणेकरांच्या व कामगारांच्या प्रश्नांसाठी नेहमीच काम केले. गिरीश बापट यांना भावपूर्ण श्रद्धांजली

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube