Narayan Rane : उद्धव ठाकरेंकडे राहिले तरी काय ? ; नारायण राणेंनी पुन्हा डिवचले
Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शिवसेनेत पडलेल्या फुटीवर राणे म्हणाले, की आता उद्धव ठाकरे यांच्याकडे राहिले तरी काय, जे काही आमदार आता आहेत ते सुद्धा निवडणुकीपर्यंत राहतील की नाही याचाही भरवसा नाही. त्यांचे कोणतेही अस्तित्व आता राहिलेले नाही. पक्षातून बाहेर पडलेले लोक आपल्याबद्दल काय बोलतात याचे त्यांनी आत्मपरिक्षण करावे असा सल्ला राणे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला.
वाचा : Nitesh Rane: ठाकरे पिता-पुत्र तुकडे तुकडे गॅंगचे सदस्य झाले का ?
ते पुढे म्हणाले, की कोणता पक्ष टिकेल हे सांगायला मी काही ज्योतिषी नाही. जे लोक काम करतात त्यांचा पक्ष टिकतो बाकीचे संपून जातात.अडीच वर्षांच्या सत्ता काळात खोके जमवले की अजून काही पवित्र कार्य केले याचे आत्मपरिक्षण उद्धव ठाकरे यांनी आता केले पाहिजे, असेही राणे यावेळी म्हणाले.
अजितदादा, तुमची पुण्यात येऊन वाजवीन; चिडलेल्या राणेंचा सज्जड इशारा
औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराच्या मुद्यावरही त्यांनी ठाकरे यांच्यावर टीका केली. नामांतरावरून आता सगळेच श्रेय घ्यायला येतील. मी केलं मी केलं असे म्हणतील. मात्र, नामांतराचा निर्णय कुणी घेतला. याबाबत कोणत्या सरकारने अधिसूचना प्रसिद्ध केली याचाही विचार त्यांनी करायला हवा,असे राणे म्हणाले. राणे यांनी अजित पवार यांनी कसबा पोटनिवडणुकीतील प्रचारादरम्यान केलेल्या टीकेचाही समाचार घेतला. अजित पवार हे कोणत्या प्रकारचे राजकारणी आहेत याबद्दल बोलू नये. मात्र, बारामतीच्या बाहेर दुसऱ्यांचे बारसे करायला त्यांनी जाऊ नये. त्यांनी माझ्या फंदात तर आजिबात पडू नये, नाहीतर मी पुण्याला येऊन बारा वाजवीन अशा शब्दांत राणेंनी अजित पवारांना सज्जड इशारा दिला.