मंत्रिमंडळ विस्तारावरून भाजपमध्ये नाराजी ? राम शिंदेंनी स्पष्टचं सांगितले

  • Written By: Published:
मंत्रिमंडळ विस्तारावरून भाजपमध्ये नाराजी ? राम शिंदेंनी स्पष्टचं सांगितले

Ram Shinde On Cabinet Expansion : सत्तासंघर्षाच्या निकालानंतर राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे जाहीर केले आहे. मुख्यमंत्री शिंदे गटाकडून इच्छुकांची संख्या जास्त आहे. तसेच भाजपमध्ये अनेक दावेदार आहे. आता या दावेदारीबाबत आमदार राम शिंदे हे स्पष्टचं बोलले आहेत.

Maharshtra Politics : मंत्रिमंडळ विस्तारात भाजपला चिंता शिवसेना फुटीची

आमदार राम शिंदे म्हणाले, राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी सूतोवाच केले आहे. त्यामुळे लवकर मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. शेवटी मंत्रिमंडळ विस्ताराचा अधिकार हा दोघांना आहे. पण सगळ्या घडामोडी लवकर होऊन मंत्रिमंडळ विस्तार होईल, असा विश्वास आमदार राम शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

लोकसभेसाठी महाविकास आघाडीचे जागावाटप, तीन पक्षांचे चार फॉर्म्युले

भाजपमध्ये मंत्री होण्यासाठी चढाओढ आहे का ? याबाबत राम शिंदे म्हणाले, भाजपमध्ये कोणीही नाराज नाही. पण प्रत्येकाला अपेक्षा असते माझे नाव मंत्रिमंडळात आले पाहिजे. त्यात काहीच गैर नसल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.

जयंत पाटील यांच्यावरील ईडी कारवाईवरून आमदार राम शिंदे यांनी विरोधकांना जोरदार सुनावले आहे. जयंत पाटील यांच्याबाबत सामनामध्ये चुकीचा दावा करण्यात आला आहे. स्वतः जयंत पाटील हे चौकशीला सहकार्य करत आहे. परंतु त्यांच्याबाबत लेख लिहिणारे संजय राऊत हे जेलमध्ये जावून आले आहेत, असा टोलाही राम शिंदे यांनी लगावला आहे.

कुकडीतून पाणी सोडण्यात येत नाही. त्यावरून राम शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे. पुण्याच्या लोकप्रतिनिधीसमोर आमदार रोहित पवार हे मूग गिळून गप्प बसत आहे. रोहित पवारांमुळे कर्जत-जामखेडमधील शेतकऱ्यांनी पाणी मिळत नसल्याचा आरोपही राम शिंदे यांनी केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube