सर्वोच्च न्यायालयातही पुण्याचं ‘बर्गर किंग’ ठरलं ‘किंग’; ब्रँड नेमला दिली परवानगी

सर्वोच्च न्यायालयातही पुण्याचं ‘बर्गर किंग’ ठरलं ‘किंग’; ब्रँड नेमला दिली परवानगी

Burger King Trademark Case : पुण्यातील प्रसिद्ध बर्गर किंगला सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मोठा दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आज मोठा निर्णय देत पुण्यातील प्रसिद्ध बर्गर किंगला ‘बर्गर किंग’ ट्रेडमार्क (Burger King Trademark) वापरण्यापासून रोखण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) आदेशाला स्थगिती दिली आहे. आज झालेल्या सुनावणीनंतर न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्न (B.V. Nagaratna) आणि न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा (Satishchandra Sharma) यांच्या खंडपीठाने हा अंतरिम आदेश दिला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात बर्गर किंग रेस्टॉरंटच्या मालकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. हे प्रकरण अमेरिकन फूड कंपनी ‘बर्गर किंग’ आणि पुणे येथील रेस्टॉरंटमधील ट्रेडमार्क वादाशी संबंधित आहे. ऑगस्ट 2024 मध्ये पुणे जिल्हा न्यायालयाने अमेरिकेच्या ‘बर्गर किंग कॉर्पोरेशन’ने पुण्याच्या बर्गर किंगविरुद्ध दाखल केलेला ट्रेडमार्क उल्लंघन खटला फेटाळून लावला होता. 1954 मध्ये ‘बर्गर किंग’ नावाने बर्गर विकण्यास सुरुवात केल्याचा दावा अमेरिकन कंपनीने केला होता. बर्गर किंग जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी फास्ट फूड हॅम्बर्गर कंपनी आहे. आजही कंपनी 100 देशांमध्ये 30, 300 लोकांना रोजगार देत आहे.

या कंपनीने 2011 मध्ये पुण्यातील रेस्टॉरंट मालकांना ‘बर्गर किंग’ ट्रेडमार्क वापरण्यावर कायमचा मनाई करण्याची आणि 20 लाख रुपयांची नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी करत खटला दाखल केला होता. तर दुसरीकडे पुण्यातील रेस्टॉरंटच्या मालक अनाहिता इराणी आणि शापूर इराणी यांनी असा युक्तिवाद केला की ते 1992 पासून आम्ही या नावाचा वापर करत आहेत तसेच अमेरिकन कंपनीने नोंदणीनंतर जवळजवळ 30 वर्षे भारतात हा ट्रेडमार्क वापरला नाही असा दावा यावेळी त्यांनी केला होता. त्यानंतर पुणे जिल्हा न्यायालयाने कंपनीचा दावा फेटाळून लावला होता. मात्र या आदेशाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

क्कॉलिटीच्या बातम्या माध्यामांना सापडत नाही म्हणून शिंदे नाराज? मुख्यमंत्र्यांनी घेतला समाचार

याचिका दाखल झाल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने डिसेंबर 2024 मध्ये ट्रायल कोर्टाच्या आदेशाला स्थगिती देत बर्गर किंग रेस्टॉरंटच्या मालकांना “बर्गर किंग” ट्रेडनाव वापरण्यापासून रोखण्याचा आदेश दिले होते. मात्र आता सर्वेच्च न्यायालयाने मोठा दिलासा देत ‘बर्गर किंग’ ट्रेडमार्क वापरण्यापासून रोखण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने हे देखील स्पष्ट केले आहे की, उच्च न्यायालय या अपीलावर सुनावणी सुरू ठेवू शकते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube