पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; कँटोन्मेंटमधील प्रवेश शुल्क होणार बंद; संरक्षण मंत्रालयाचा आदेश
Pune Cantonment Veicle Entry Fee Cancel: पुणे कँटोन्मेंट बोर्डच्या (Pune Cantonment Board)हद्दीमधील प्रवेश करण्यासाठी वसूल केलं जाणारं वाहन प्रवेश शुल्काची(Veicle Entry Fee) वसुली बंद करण्यात आली आहे. हे प्रवेश शुल्क बंद करण्याचे आदेश केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने दिले आहेत. राजपत्रित आदेशाद्वारे (Gazetted Orders)पुणे कॅन्टोन्मेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्रत पाल (Chief Executive Officer Subrata Pal)यांना वाहन प्रवेश शुल्क बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
Asad Ahmed Encounter : ‘भाजपला न्याय व्यवस्थेवर विश्वास नाही’, अखिलेश यादव यांचा योगींवर हल्लाबोल
या निर्णयामुळे पुणेकरांची व्यावसायिक वाहनांना आता कँटोन्मेंटच्या हद्दीत निशुल्क प्रवेश करता येणार आहे. यावर पुणे कँटोन्मेंट प्रशासनानं आपल्याला अद्याप याबद्दल कोणतेही आदेश मिळाले नसल्याचे सांगितले आहे. यापूर्वीही संरक्षण मंत्रालयाने वाहन प्रवेश शुल्क रद्द करण्याच्या सूचना दिल्या होत्या. कँटोन्मेंटच्या अधिकाऱ्यांनी याची वसुली सुरुच ठेवली होती. त्यानंतर दोन वर्ष ही वसूली सुरु होती. त्यावर आता बुधवारी पुन्हा एकदा वाहन प्रवेश शुल्क रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. आता मात्र हा आदेश कँटोन्मेंट प्रशासनाला मान्य करावा लागणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
पुणे कँटोन्मेंटला 2019 च्या आधी दरवर्षी 10 ते 10.05 कोटी रुपयांचं उत्पन्न वाहन प्रवेश शुल्कातून मिळत होतं. 2019 मध्ये वाहन शुल्कात वाढ केली होती. त्यामुळे कँटोन्मेंटला वर्षभरात जवळपास 15 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळू लागलं. आता मात्र ही वसुली बंद होणार आहे. त्यामुळं कँटोन्मेंटला सरळसरळ 15 कोटी रुपयांचा फटका बसणार आहे.
त्यामुळे आता कँटोन्मेंटच्या भागातून व्यावसायिक वाहतूक करणाऱ्या प्रवासी वाहने, मालवाहतूक करणारे टेम्पो, ट्रकचालकांना यातून मोठा दिलासा मिळणार आहे. या वाहनचालकांना यावर महिण्याला हजारो रुपये खर्च करावे लागत होते. पण आता हे प्रवेश शुल्क रद्द केल्याने वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.