Chandrakant Patil : कसबा, चिंचवडचा ‘सस्पेन्स’ कायम… नावे संध्याकाळी कळणार ?
पुणे : कसबा पेठ (Kasba Bypoll) आणि चिंचवड (Chinchwad Bypoll) पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ६ फेब्रुवारी हा अंतिम दिवस आहे. मात्र, अद्यापपर्यंत महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टी (BJP) यांचा उमेदवार अद्याप जाहीर केलेला नाही. भाजपकडून कसबा पेठ आणि चिंचवडसाठी अजूनही नाव (Candidate Name) कोणाचे ही नाव निश्चित झालेले नाही. ती आज संध्याकाळपर्यंत जाहीर होतील, अशी अपेक्षा भाजपचे आमदार तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या दोन्ही मतदार संघात उमेदवारी नक्की कोणाला मिळणार याची उत्सुकता कायम आहे.
कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात आमदार मुक्ता टिळक, तर चिंचवड मतदारसंघात लक्ष्मण जगताप यांच्यानिधनानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. ही पोटनिवडणूक जिंकण्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यासाठी भाजपची आज महत्वाची एक बैठक पार पडली. चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भाजपचे सहयोगी पक्ष बाळासाहेबची शिवसेना, आरपीआय (आठवले गट) यांच्यासह विविध संघटना आणि कसबा विधानसभा मतदार संघातील इच्छुक उमेदवारांची बैठक झाली. त्यावेळी चंद्रकांत पाटील बोलत होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीबाबत आजपर्यंत अनेकवेळा बैठका झाल्या आहेत. या दोन्ही निवडणुका बिनविरोध झाल्या पाहिजे. यासाठी भाजपकडून सर्व पक्षाच्या नेत्यांना पत्राद्वारे विनंती केली आहे. तसेच, या करीता राजकीय रणनीतीकार म्हणून आमदार माधुरी मिसाळ यांची सर्व पक्षाच्या प्रमुखशी चर्चा करण्यासाठी नेमणूक करण्यात आली आहे. त्या सर्व नेत्यांशी संवाद साधत आहे. त्याच दरम्यान आमच्याकडून केंद्रीय समितीकडे इच्छुक उमेदवारांची नाव पाठविण्यात आली आहे. आज संध्याकाळपर्यंत नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. अजुन देखील वाटत की, ही निवडणूक बिनविरोध होईल. निवडणुकीत गाफिल राहाता कामा नये. त्या दृष्टीने आम्ही निवडणुकीची तयारी केल्याच त्यांनी सांगितले.