पाडव्याला गोविंदबागेत महाराष्ट्रातील एकाही नेत्याला येऊ देणार नाही! धनगर समाजाचा इशारा

पाडव्याला गोविंदबागेत महाराष्ट्रातील एकाही नेत्याला येऊ देणार नाही! धनगर समाजाचा इशारा

बारामती : पाडव्याला गोविंदबागेत महाराष्ट्रातील एकाही नेत्याला येऊ देणार नाही, आपण सर्वांनी या लढ्याला पाठिंबा द्यावा, असे आवाहन करत धनगर समाजाने आक्रमक इशारा दिला आहे. मागील चार दिवसांपासून बारामती प्रशासकीय भवन समोर सकल धनगर समाजाच्या वतीने चंद्रकांत वाघमोडे पाटील यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. यावेळी उपस्थित आंदोलकांनी हा इशारा दिला. (Chandrakant Waghmode Patil has started a fast to death in front of Baramati Administrative Building on behalf of Sakal Dhangar Samaj.)

मागील दोन महिन्यांपूर्वी चोंडीमध्ये धनगर समाजातील उपोषणकर्त्यांना एस.टी. आरक्षणाची अंमलबजावणी करु, असे आश्वासन दिले होते. या आश्वासनाची मुदत 15 नोव्हेंबर संपत आहे, परंतु अद्याप सरकारकडून कोणत्याही प्रकारची सकारात्मक हालचाल दिसून येत नाही. त्यामुळे 9 नोव्हेंबरपासून बारामती प्रशासकीय भवन समोर सकल धनगर समाजाच्या वतीने चंद्रकांत वाघमोडे पाटील यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे.

शरद पवारांचा पुरंदर दौरा रद्द! प्रकृतीबाबत डॉक्टरांनी दिली माहिती; पाडव्याची भेट होणार का?

दिवाळीनिमित्त अनेक वर्षांपासून सर्व पवार कुटुंबीय बारामतीच्या गोविंदबाग या निवासस्थानी एकत्र येत असते. यंदाही शरद पवार यांच्यासह सर्व कुटुंबिय बारामतीमध्ये उपस्थित आहे. पाडव्याला बारामतीतील नागरिक आणि राज्यभरातून नेते, कार्यकर्ते पवार कुटुंबियांना शुभेच्छा देण्यासाठी येत असतात. शिवाय पाडव्याच्या दिवशी श्री महावीर भवन येथे संध्याकाळी पाच वाजता बारामतीच्या व्यापाऱ्यांशीही संवाद साधणार आहेत. याच दिवशी गोविंदबागेत महाराष्ट्रातील एकाही नेत्याला येऊ देणार नाही, असा इशारा धनगर समाजाने दिला आहे.

अजित पवार उपस्थित राहणार का?

दरम्यान, यंदा राष्ट्रवादीत (NCP) फूट पडल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार पाडवा गोविंद बागेत साजरा करणार का, याबाबत उत्सुकता आहे. अशात डेंगी आजारामुळे डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला असल्याने आपण उपस्थित राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. मात्र त्यानंतरही अजित पवार यांचा दिल्ली आणि बारामती दौरा पार पडला आहे. त्यानंतर पुण्यात पवार कुटुंबीयांच्या दिवाळी स्नेहभोजनाला अजित पवार सामील झाले होते.

शरद पवार मराठाच! थेट पुरावा दाखवत ‘OBC’ असल्याचा दावा समर्थकांनी खोडला

शरद पवार यांचे बंधू प्रतापराव पवार याचं पुण्यातीतील बाणेर परिसरात निवास्थान आहे. त्यांच्या निवासस्थानी सर्व पवार कुटुंबीय एकत्र जमले होते. रक्षाबंधनाला अजित पवार आले नव्हते. त्यामुळे दिवाळी आणि भाऊबीजेला येणार का, असा प्रश्न विचारला जात होता. मात्र, आज पवार कुटुंबीयांच्या दिवाळी स्नेहभोजनाला ते उपस्थित होते. सकाळी बारा वाजताच्या सुमारास अजित पवार आणि त्यांची पत्नी सुनेत्रा पवार हे बाणेरला पोहोचले. त्यापूर्वीच सुप्रिया सुळे आणि शरद पवार हे बाणेरला पोहोचले होते. त्यानंतर अजितदादा दिल्लीला रवाना झाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube