संजय काकडेंकडून फडणवीसांच्या आठवणींना उजाळा अन् खास शुभेच्छा!

  • Written By: Published:
संजय काकडेंकडून फडणवीसांच्या आठवणींना उजाळा अन् खास शुभेच्छा!

Sanjay Kakde Wish Devendra Fadanvis :  राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज (दि. 22) वाढदिवस. त्यांच्या खास राजकीय शैलीमुळे त्यांचे स्वतःच्या पक्षासह इतर पक्षांमध्येही मैत्रिपूर्ण संबंध आहेत. याच त्यांच्या स्वभावाबद्दल भाजपचे माजी खासदार संजय काकडेंनी फडणवीसांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणजे अभ्यासू, कर्तृत्त्ववान आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्व होय. आजच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याबद्दल थोडंसं सांगावं वाटतं.

जसं आहोत तसं आम्ही एकमेकांना स्वीकारलं

काकडे म्हणाले की, माझा आणि त्यांचा परिचय ते भाजपाचे प्रदेशाध्यक्ष होण्यापूर्वी झाला. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब यांच्यामुळं फडणवीस साहेबांशी ओळख झाली. आमच्यातली मैत्री निखळ आणि स्वच्छ आहे. जसं आहोत तसं आम्ही एकमेकांना स्वीकारल्याचे काकडे म्हणाले. २०१४ व २०१९ च्या पुणे लोकसभा व शहरातील आठ विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या विजयासाठी फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मला महत्वाची भूमिका बजावता आली. विशेषतः २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट आणि कोथरुड विधानसभा मतदार संघात भाजपाच्या विजयासाठी मी काम केले व विजय मिळवून दिला.

Devendra Fadanvis Birthday

Devendra Fadanvis Birthday

फडणवीसांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम फत्ते

फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या पुणे महापालिका निवडणुकीत जिथं भाजपाची ताकद नाही त्याठिकाणी भाजपाचे नगरसेवक निवडून आणण्याची फडणवीस साहेबांनी माझ्यावर जबाबदारी सोपवली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम देखील मी फत्ते केली आणि सर्वाधिक ९८ नगरसेवक जिंकून आणले. इतिहासात पहिल्यांदाच पुणे महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकला.

संजय काकडेंकडून फडणवीसांच्या आठवणींना उजाळा अन् खास शुभेच्छा!

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे (भाजयुमो) वार्ड अध्यक्ष ते उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी ते नगरसेवक आणि पुढे नागपूरचे महापौर झाले. १९९९ ला पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर सलग पाचवेळा ते निवडून आले. त्यांनी विरोधकांना सळो की पळो करून सोडलं आहे. ‘केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र’ अशी घोषणा झाल्यानंतर २०१४ मध्ये महाराष्ट्राचे भाजपाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी शपथ घेतली.

फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर महाराष्ट्रात समृद्धी महामार्ग, मुंबईतील कोस्टल रोड, जलयुक्त शिवार योजना व वृक्ष संवर्धन, मुंबई, पुणे, नागपूर याठिकाणी मेट्रोचं जाळं, समान पाणी पुरवठा योजना, पुरंदरला आंतरराष्ट्रीय विमानतळ, चांदणी चौकातील उड्डाणपूल, कात्रज-कोंढवा रस्ता, स्मार्ट सिटी अशा अनेक योजना गतिशीलपणे राबवल्या गेल्या. फडणवीस साहेबांच्या या तळमळीनं काम करण्याच्या वृत्तीचा आणि अभ्यासूपणाचा उपयोग महाराष्ट्राच्या कल्याणासाठी होवो. त्यांच्या हातून राष्ट्राची महाराष्ट्राची सेवा घडो आणि यासाठी त्यांना निरोगी उदंड आयुष्य मिळो ! साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

गडकरी शब्दाला पक्के… काकडेंनी सांगितला किस्सा

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube