पुण्यातील ऐतिहासिक वारसा स्थळांसाठी स्वतंत्र एसपीव्ही स्थापन करा; आमदार हेमंत रासनेंची विधानसभेत मागणी

Rasane demands SPV for Pune's historical heritage पुण्यातील ऐतिहासिक वारसा स्थळांसाठी एसपीव्ही स्थापन करा आमदार हेमंत रासने यांची मागणी

Rasane Demands SPV For Pune's Historical Heritage

Establish dedicated SPV for Pune’s historical heritage sites MLA Hemant Rasane demands in Legislative Assembly : पुण्यातील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा स्थळांचा जागतिक दर्जाचा विकास करण्यासाठी स्वतंत्र स्पेशल पर्पज व्हेईकल (एसपीव्ही) स्थापन करावी अशी मागणी आमदार हेमंत रासने यांनी विधानसभेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे केली.

रासने म्हणाले, “कसबा गणपती, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, शनिवार वाडा, लाल महाल, भिडे वाडा, महात्मा फुले मंडई, तुळशीबाग, विश्रामबाग वाडा, उमाजी नाईक स्मारक, लहुजी वस्ताद साळवे स्मारक, खडक पोलीस वसाहत आणि इतर वारसा स्थळांचा समावेश असलेला एकात्मिक वारसा विकास आराखडा तयार करावा. या आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करावी.”

Khadakwasla Dam : पुणेकरांच्या चिंतेत भर, खडकवासला धरणात 10 वर्षांतील सर्वात कमी पाणीसाठा

रासने पुढे म्हणाले, “वारसा संरक्षण व संवर्धन, पादचारी मार्ग, आकर्षक प्रकाशयोजना, माहिती केंद्रे, सांस्कृतिक चौक, डिजिटल पर्यटन सुविधा, पार्किंग, शनिवार वाडा ते स्वारगेट भुयारी मार्गाच्या कामाला गती तसेच आधुनिक वाहतूक व्यवस्थापनाचा समावेश असलेला विशेष कृती आराखडा तयार करून पुण्याला ‘विरासत आणि विकास’ या संकल्पनेतून जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी शासनाने निर्णय घ्यावा.”

लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला राज्य शासनाने ‘राज्य उत्सव’ म्हणून दर्जा दिला असून पुण्याचे आराध्य दैवत असलेल्या दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला ‘अ’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा प्रदान केल्याबद्दल रासने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानले.

चर्चा तर होणारचं! ‘मनःशांती’ साठी IITian तरुणीचा 32 लाखांच्या नोकरीला नकार…

ते म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गेल्या वर्षी राज्य शासनाने पंढरपूर यात्रेचे यशस्वी नियोजन करण्यात आले, ज्याचे सर्वत्र कौतुक झाले. त्याच धर्तीवर पुण्यातील गणेशोत्सवासाठी शनिवार वाडा परिसरात सांस्कृतिक महोत्सव, आकर्षक रोषणाई, स्वागत कमानी, सुलभ स्वच्छतागृहे, वाहतूक व्यवस्थापन, पार्किंग, सुरक्षा व्यवस्था, पोलीस दलाचे सक्षमीकरण आदी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने विशेष निधी द्यावा अशी मागणी केली आहे.”

follow us