Dr. Ram Takwale : ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि माजी कुलगुरू डॉ. राम ताकवले यांचे निधन

Dr. Ram Takwale : ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि माजी कुलगुरू डॉ. राम ताकवले यांचे निधन

Former Vice Chancellor Dr. Ram Takwale passed away : आता एक दु:खद वार्ता आहे शिक्षणक्षेत्रातून. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राम ताकवले (Former Vice Chancellor Dr. Ram Takwale) यांचे काल (दि. 13 मे) शनिवारी रात्री साडेनऊ वाजता निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 90 वर्षांचे होते. 1956 मध्ये फर्ग्युसन कॉलेजमधून (Ferguson College) त्यांनी बीएस्सी आणि 1957 मध्ये पुणे विद्यापीठातून एम. एस.सीचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनी भौतिकशास्त्र आणि सैद्धांतिक भौतिकशास्त्राचा अध्ययन केले. 1988-1989 या कालावधीत त्यांनी पुणे विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम पाहिले. त्यांचे वडील प्राथमिक शिक्षक होते. दरम्यान, त्यांच्या पार्थिवावर रविवारी (दि. 14) सकाळी वैकुंठ स्मशानभूमीत (Vaikunth Crematorium) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर घरीच उपचार केले जातात. वृद्धापकाळामुळे ते उपचाराला प्रतिसाद देत नव्हते, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. डॉक्टर ताकवले यांचा जन्म 11 एप्रिल 1933 रोजी पुरंदर तालुक्यातील हरगुडे गावात झाला. त्यांचे शालेय शिक्षण गावातच झाले. त्यानंतर पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले; त्यांनी पुणे विद्यापीठातून (आताचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) भौतिकशास्त्रात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी मॉस्को स्टेट युनिव्हर्सिटीमधून संशोधन पदवी प्राप्त केली.

Kishore Aware Murder ; बापाच्या अपमानाचा घेतला बदला, माजी नगरसेवकाच्या मुलाला अटक

पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. 1978 मध्ये त्यांची तत्कालीन पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड झाली. त्यानंतर 1989 मध्ये त्यांच्या प्रयत्नांमुळे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची स्थापना झाली. मुक्त विद्यापीठाचे पहिले कुलगुरू म्हणून त्यांची नियुक्ती झाली. 1996 ते 1998 या काळात त्यांच्यावर इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. याव्यतिरिक्त, त्यांनी राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेचे (NAC) अध्यक्ष म्हणूनही काम केले. डॉ.ताकवले यांनी राज्यातील व देशातील शिक्षणाची दिशा बदलून महत्त्वाचे योगदान दिले.

ताकवले यांनी घडवलेले विद्यार्थी आज देशाच्या, जगाच्या कानाकोपऱ्यात अनेक क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देत आहे. दरम्यान, डॉ. ताकवले यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रावर शोककळा पसरली असून अनेकांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. “ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, तत्कालीन पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राम ताकवले सरांच्या निधनानं उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात मौलिक कार्य करणारं, राज्याच्या, देशाच्या शिक्षणक्षेत्राला दिशा देणारं महान व्यक्तिमत्वं हरपलं आहे. उच्च शिक्षणाचा प्रसार आणि दर्जा उंचावण्यात त्यांनी मोलाचं योगदान दिलं. डॉ. ताकवले सरांचं निधन ही राज्याच्या, देशाच्या शिक्षण क्षेत्राची मोठी हानी आहे. मी सरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी डॉ. राम ताकवले यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube