संतापजनक! पुणे रेल्वे स्थानकावर नराधमाचा 4 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार
आई-वडील आणि इतर मुलं गाढ झोपेत असताना चार वर्षांची ही बालिका जागी असल्याचं पाहून आरोपीची तिच्यावर नजर टाकली.
पुणे रेल्वे स्थानकावर धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. (mp) आपल्या गावी परतण्यासाठी आई-वडिलांसोबत स्थानकावर थांबलेल्या अवघ्या 4 वर्षांच्या चिमुरडीवर एका नराधमाने मध्यरात्रीच्या सुमारास लैंगिक अत्याचार केला आहे. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी एका नराधमाला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही मूळची मध्य प्रदेश राज्यातील आहे. तिचे आई-वडील महाराष्ट्रात ऊसतोडणी मजूर म्हणून आले होते. ऊसतोडणीचा हंगाम संपल्यानंतर हे कुटुंब चार लहान मुलांसह पुन्हा आपल्या गावी जाण्यासाठी १६ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री पुणे रेल्वे स्थानकावर आले होते. मध्य प्रदेशला जाणारी गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी असल्याने हे कुटुंब प्लॅटफॉर्मवरच मुक्कामाला थांबलं होतं.
संतापजनक! ऊस वाहतूक ट्रॅक्टर चालकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार
मध्यरात्रीच्या सुमारास आई-वडील आणि इतर मुलं गाढ झोपेत असताना चार वर्षांची ही बालिका जागी असल्याचं पाहून आरोपीची तिच्यावर नजर टाकली. त्याने या चिमुरडीला चॉकलेट आणि बिस्किटं देण्याचं आमिष दाखवलं. खाऊच्या बहाण्याने त्याने या बालिकेला आई-वडिलांच्या जवळून उचलून प्लॅटफॉर्म क्रमांक २ आणि ३ च्य शेवटी जिथे अंधार आणि निर्जनता होती, तिथे नेले आणि तिच्यावर अत्याचार केला.
काही वेळाने मुलगी दिसून न आल्याने आई-वडिलांनी शोधाशोध सुरू केली. मुलीच्या ओरडण्यामुळे आणि संशयास्पद हालचालींमुळे हा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच पुणे लोहमार्ग पोलिसांनी तातडीने धाव घेत एका आरोपीला ताब्यात घेतलं. आरोपी देखील परप्रांतीय असल्याचं निष्पन्न झालं आहे.
