Pune : टोईंग कर्माचारी अन् दुकानदारामध्ये पोलिसांसमोरच फ्री स्टाईल हाणामारी…

Untitled Design   2023 05 02T093604.643

Free style brawl in Pune : पुण्यातील वाहतूक समस्या ही सर्वश्रुत आहे. त्यात वाहतुकीची नियम आणि पार्किंगची समस्या यामुळे वाहतूक पोलीस, टोईंग कर्मचारी आणि चालकांमध्ये सातत्याने कुठल्या ना कुठल्या कारणाने वाद पाहायला मिळतात.

दरम्यान, हडपसर परिसरात असाच काहीसा प्रकार घडला असून टोइंग कर्मचारी आणि दुकानदारांमध्ये कपडे फाटेपर्यंत फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. आणि हा व्हिडिओ समोर आला आहे.

हडपसर परिसरातील महादेवनगर येथील दुकानदार रमेश बराई यांना रस्त्यावरील वाहने उचलण्यासाठी वाहतूक शाखेने नेमलेल्या कर्मचार्‍यांनी तुफान मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आलाय. यामध्ये विशेष म्हणजे वाहतूक पोलीस कर्मचाऱ्या समोरचं ही फ्री स्टाईल हाणामारी झाली. यामध्ये रमेश बराई यांना टोईंग कर्मचाऱ्यांनी कपडे फाटेपर्यंत मारहाण केली आहे. यासंदर्भात बराई यांनी तक्रार दिली असून या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Mohit Kamboj : राऊतांच्या ‘त्या’ आरोपांनंतर आज कंबोज पत्रकार परिषद घेणार

बराई यांचे महादेवनगर परिसरात फुटवेअरचे दुकान आहे. त्यांच्या दुकानासमोर दुचाकी खालीपडून पेट्रोल गळत होते. ती उभी करत असताना टोइंग व्हॅन अन् पोलिस कर्मचारी महिलेसह गाडी उचलणारे तरुण खाली उतरले. त्यावेळी एकाने दुकानदार बराई यांच्याशी वाद घालण्यास सुरूवात केली. त्यांना शिवीगाळी करत मारहाण करण्यास सुरूवात केली. कर्मचाऱ्याने मारहाण केल्याने बराई यांना देखील राग अनावर झाला आणि त्यांनीही थेट हातात वीट घेऊन कर्मचाऱ्यांच्या दिशेने धाव घेतली. मग काय वाद अधिकच पेटला.

सदर घटना घडत असताना तेव्हा एक महिला पोलिस कर्मचारी देखील तेथे उपस्थित होत्या. त्यांच्या समोर बराई वीट घेऊन धावून आले. त्यामुळे तरुण कर्मचारी मुलांनी बराई यांना कपडे फाटेपर्यंत मारहाण केली. हा धक्कादायक प्रकार मात्र, तिथे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. आता या प्रकरणी कर्मचाऱ्यावर कारवाई होते की दुकानदारालाही दोषी ठरविण्यात येते. हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Tags

follow us