Pune News : दक्षिण पुण्यात सावंत विहार येथे विकासकामांचा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न

Pune News : कार्यसिद्धी प्रतिष्ठानचे संस्थापक, युवा नेते गिरीराज सावंत यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सावंत विहार, कात्रज येथील भिंतीचे

  • Written By: Published:
Pune News

Pune News : कार्यसिद्धी प्रतिष्ठानचे संस्थापक, युवा नेते गिरीराज सावंत यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सावंत विहार, कात्रज येथील भिंतीचे बांधकाम, सुशोभीकरण आणि विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा काल मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री तथा विद्यमान आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत साहेब यांच्या शुभहस्ते व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमात कार्यसिद्धी प्रतिष्ठानच्या “कार्यसिद्धी दिनदर्शिका 2026” चे देखील प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

यावेळी गिरीराज सावंत (Giriraj Sawant) यांनी आपल्या भाषणात दक्षिण पुण्यात लोकांच्या मागणीनुसार पाठपुरावा करून महानगरपालिकेच्या माध्यमातून आणलेल्या विकासनिधीचा आणि पूर्ण झालेल्या विकास कामांचा विशेष उल्लेख केला. त्यांनी आतापर्यंत सुमारे 12 कोटींहून अधिक निधी आणल्याचे नमूद केले, ज्यातून खालील काही महत्त्वपूर्ण कामे मार्गी लागली आहेत व काही कामे लवकरच पूर्णत्वास येणार आहेत:

-सावंत विहार फेज 3 ते अहिल्यादेवी होळकर उद्यान दरम्यान रस्ता
-कात्रज डेअरी मागील भिंत व त्यावरील म्युरल्स उभारणे (सुशोभीकरण)
-आंबेगाव पठार येथे बहुउद्देशीय सांस्कृतिक भवन उभारणे
-कात्रज परिसरात नाट्यग्रहासाठी मंजुरी
-वंडर सिटी शेजारील जागेत योगा हॉल बांधणे
-सातारा रोड, कात्रज ते मोरेबाग बस स्टॉप ड्रेनेज लाईन टाकणे

गिरीराज सावंत यांनी येणाऱ्या काळात स्मार्ट प्रभाग, ऑक्सिजन पार्क, ट्रॅफिक फ्री भाग आणि सुरक्षित परिसर निर्माण करण्याचे व्हिजन स्पष्ट केले. माजी आरोग्यमंत्री, आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी आपल्या भाषणात गिरीराज सावंत यांच्या कार्याचा उल्लेख करत त्यांच्यातील नेतृत्वाचे कौतुक केले.

ते म्हणाले की, लोकप्रतिनिधी सुसंस्कृत असावा, ताकदीने काम करणारा असावा, व्हिजन असणारा असावा. तसेच त्यांनी आपल्या आरोग्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातील ‘आरोग्याची वारी पंढरीच्या दारी’ या उपक्रमाचा आणि ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ या योजनेचा उल्लेख केला, ज्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर नोंद घेतली गेली. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात महायुतीचे सरकार असून, पुण्यातही जनता महायुतीला 100% निवडून देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

गिरीराज सावंत हे तानाजी सावंत यांच्या समाजसेवेचा वारसा संवेदनशीलतेने जपत आहेत. त्यांनी महापालिका किंवा अन्य कोणत्याही पदावर नसतानाही सातत्याने जनतेचे प्रश्न सोडविण्याचे आणि 12 कोटींची कामे मार्गी लावण्याचे कार्य केले आहे. कार्यसिद्धी प्रतिष्ठानच्या माध्यमातून मागील 5 वर्षांपासून सुरू असलेल्या सामाजिक उपक्रमांची माहिती यावेळी देण्यात आली.

-भुकेल्याचा घास उपक्रम: संबंध पुण्यात 20 फेब्रुवारी 2023 पासून सुरू 2,51,335 पेक्षा जास्त जेवणाचे डबे वितरित.

-मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर: 350 पेक्षा जास्त मोतीबिंदूग्रस्त रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया.

– भव्य रक्तदान शिबीर: 1500 हून अधिक नागरिकांनी निःस्वार्थपणे रक्तदान केले.

–  ॲम्बुलन्स लोकार्पण सेवा

– दिव्यांग सहाय्यता उपकरण वाटप

–  ‘माणुसकीची दिवाळी’ (फराळ व कपडे वाटप)

– मोफत महाआरोग्य शिबिर असे अनेक सामाजिक उपक्रम घेतले.

या भव्य सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत, नगरसेविका वर्षा तापकीर, नगरसेविका रानी भोसले, दादा देवकर, गाडेकर सर, मिलिंद पन्हाळकर, रायबा भोसले, अभिषेक तापकीर, सचिन बदक, नाना निवगुने, कुंजीर सर, दिलीप जगताप, शंकर कडू, डॉ. संजय जगताप, राजाभाऊ घाडगे, अनंत शिंदे, महेश भोसले, रणधीर गायकवाड, गीतांजली जाधव, विविध सामाजिक संस्थांचे प्रमुख आणि दक्षिण पुण्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रुपया सर्वकालीन नीचांकी पातळीवर, एका डॉलरची किंमत 90.82 रुपये

follow us