आयकर विभागाचे पुण्यातील बांधकाम व्यावसायिकांवर धाडसत्र, अनेकांचे धाबे दणाणले

Untitled Design   2023 05 04T110725.455

Income Tax Department raids house of builders in Pune : गेल्या काही दिवसापासून राज्यात अनेक ठिकाणी आयकर विभागाने (Income Tax Department) छापेमारी करून मोठ्या कारवाया केल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच नाशिकमधील पंधाराहून अधिक बांधकाम व्यावसायिकांच्या घरी छापेमारी केली होती. कर चुकवेगिरी करणाऱ्या या बांधकाम व्यावसायिकांच्या घरी छापेमारी (Raids at builders’ homes) झाल्यानं एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, आता पुणे शहरातही आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून छापेमारी करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील अनेक बांधकाम व्यावसायिक हे आयकर विभागाच्या रडारवर आहेत. आज सकाळी आयकर विभागाकडून ही कारवाई सुरू झाली आहे. पुणे येथील अधिकाऱ्यांचे पथक ही कारवाई करत आहे. सकाळपासून आयकर विभागाचे अधिकारी बांधकाम व्यावसायिकांच्या घरी पोहोचले आहेत. आणि कागदपत्रांची तपासणी करत आहेत.

पुण्यातील बाणेर रोडवरील सिंध सोसायटीत आयकर विभागाची छापेमारी सुरू आहे. सिंध सोसायटीत राहायला असणाऱ्या तीन बांधकाम व्यावसायिकांवर छापेमारी केली जात आहे. हे तीनही बांधकाम व्यावसायिक एकमेकांचे भागीदार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, अद्याप या व्यावसायिकांची नावे उघड झाली नाहीत. आयकर विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तात्काळ बांधकाम व्यावसायिकांचे घर गाठल्याने परिसरात एकच कुतूहल निर्माण झाले. या कारवाईमुळे कर चुकवेगिरी करणाऱ्या पुण्यातील बांधकाम व्यावसायिकांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.

Swapnil Mayekar : लेखक-दिग्दर्शक स्वप्निल मयेकर यांचं निधन, उद्या त्यांचा चित्रपट प्रदर्शित होणार

दरम्यान, या चौकशीत आता काय समोर येते, आयकर विभागाच्या हाती काही घबाड लागतं का, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us