भाजपमध्ये ब्राह्मणांवर अन्याय होतोय का ? सुनील देवधरांचे थेट उत्तर

  • Written By: Published:
भाजपमध्ये ब्राह्मणांवर अन्याय होतोय का ? सुनील देवधरांचे थेट उत्तर

पुणेः निवडणूक जाहीर होण्याआधीच पुणे लोकसभेची (Pune Loksabha) निवडणूक लढविणार असल्याची घोषणा भाजपचे नेते सुनिल देवधर (Sunil Devdhar) यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर सुनिल देवधर यांनी लेट्सअप मराठीशी संवाद साधला आहे. यावेळी देवधर यांनी अनेक विषयांवर बेधडकपणे भाष्य केले आहे. भाजपमध्ये ब्राम्हण समाजावर अन्याय होतो का ? या प्रश्नावर देवधर यांनी थेटपणे उत्तर दिले आहे.

‘खोके सरकारचं मंत्रालय दिल्लीत, वेदांता पळवला तेव्हा सीएम फक्त दाढ्या…’; आदित्य ठाकरेंची बोचरी टीका

मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पोटनिवडणुकीत भाजपकडून हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली होती. कोथरुडमध्ये मेधा कुलकर्णी यांना डावलण्यात आले होते. भाजपमध्ये ब्राह्मण समाजावर अन्याय होतोय, असा मुद्दा गाजला होता. त्यावर देवधर म्हणाले, मी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा स्वंयसेवक आहे. जात विचारायची नाही आणि जात सांगायची नाही. माझे असंख्य मित्र आहेत. काहींचे आडनावे बोलतात. माझेही आडनाव बोलते. परंु आम्ही कधीही जाती-पातीचा विचार केला नाही. संघाने बहुजन समाजाचे काम केले आहे. जनजातीमध्ये काम केले आहे. आदिवासींमध्ये काम केले आहे. जे ते खातात ते खाल्ले आहे.

हिंदूंकडे वाकड्या नजरेनं पाहाल तर नजर जाग्यावर ठेवणार नाही; नितेश राणेंचा इशारा

कसबा मतदारसंघातील निवडणुकीचे काय विश्लेषण करण्यात आले त्याची कल्पना मला नाही. मी एक देशभक्त आहे. देशासाठी मला काम करायचे आहे. सर्वांना बरोबर घेऊन काम करायचे आहे. सगळ्यांचा विश्वास घ्यायचे आहे. नाराज असतील, त्यांनाही विश्वासात घ्यायचे असल्याचे देवधर यांनी सांगितले आहे.

हिंदुत्वावर तुम्ही बोलले नाही तर सनातन धर्म बुडणार आहे का ? यावर देवधर म्हणाले, आम्ही हिंदुत्वनिष्ठ आहे. सनातनी असणे चुकीचे नाही. सनातन धर्मामध्ये व्याधी, विकृती आल्या होत्या. आमच्यात चुकीच्या रुढी, परंपरा आलेल्या आहेत. चुकीच्या प्रॅक्टिस आलेल्या आहे. त्यामुळे समाजामध्ये परिवर्तन घडविण्यासाठी महापुरुष उभे राहिले आहेत. त्यांनी चिखलफेक सहन केली आहे. सनातन धर्माचा अभिमान असला पाहिजे आहे. हिंदुत्वनिष्ठ असणे म्हणजे दुसऱ्या पुजापद्धतीचा द्वोष करत नाही.

तेव्हा तथाकथीत भयाचे वातावरण होते का ?

आपल्या देशामध्ये दिलीपकुमार, अजित हे अभिनेते, मधुबाला, मीनाकुमारी या अभिनेत्री होत्या. हे सर्वजण मुस्लिम होते. पण त्यांनी हिंदुची नावे का लावली. हा देश बहुसंख्य हिंदुचा आहे. त्यामुळे युसूफ खानपेक्षा दिलीपकुमार नाव लोकप्रिय होते. तेव्हा तथाकथीत भयाचे वातावरण होते का ? असा सवाल देवधरांनी उपस्थित केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube