ह.भ.प. अमृताश्रम महाराज स्वामी जोशींना जाधवर इन्स्टिट्युकडून कीर्तन महर्षी पुरस्कार

Jadhavar Group Of Institutes Pune : ह.भ.प. अमृताश्रम महाराज स्वामी जोशी यांना पुण्यातील जाधवर इन्स्टिट्युकडून (Jadhavar Group Of Institutes Pune) कीर्तन महर्षी पुरस्कार प्रदान करण्यात आलायं. शालेय विद्यार्थी, तरुणाई, पालक व नागरिकांना कीर्तनाद्वारे प्रबोधनासाठी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटस् तर्फे सहाव्या कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील चार दिग्गज कीर्तनकारांनी कीर्तन केलंय. प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर यांनी याबाबत माहिती दिलीयं.
Video : आमची गाडी छान चाललीयं, तिघंही तीन शिफ्टमध्ये चालवतो; फडणवीसांची मिश्किल टिप्पणी…
कीर्तन महोत्सवामध्ये सायंकाळी ६ ते ७ यावेळेत हरिपाठ तसेच सायंकाळी ७ वाजता ह.भ.प. सुनील महाराज निवंगुणे, ह.भ.प. अमृताश्रम महाराज स्वामी जोशी यांचे कीर्तन झाले. यंदाचा कीर्तनकेसरी पुरस्कार अमृताश्रम महाराज स्वामी जोशी यांना प्रदान करण्यात आला.
ह.भ.प. संतोष महाराज पायगुडे यांचे कीर्तन झाले. महोत्सवाचा समारोप शुक्रवार, दिनांक ६ जून रोजी सकाळी १० वाजता शिवशंभु व्याख्याते, भागवत कथाकार ह.भ.प.गुरुवर्य राजेंद्र महाराज येप्रे यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. महोत्सवाची सांगता दुपारी १२ ते २ यावेळेत महाप्रसादाने होणार आहे. ह.भ.प.येप्रे महाराज साधक वर्ग आणि समस्त ग्रामस्थ न-हेगाव यांनी संयोजनात सहभाग घेतला आहे.
अॅड.शार्दुल जाधवर म्हणाले, शिक्षणमहर्षी प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर यांच्या वाढदिवसानिमित्त जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटटस्च्या वतीने या सहाव्या कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थी व तरुणवर्गाला आपल्या परंपरा, कला व संस्कृतीचे दर्शन व्हावे, याकरीता असे उपक्रम घेतले जातात. https://youtube.com/c/JadhavarGroupAdvShardulraoSudhakarraoJadhavar या लिंकवरुन कीर्तनांचा आनंद घेता येणार आहे.