Rishi Sunakची वाचकांना भूरळ, फक्त 8 दिवसांत तिसरी आवृत्ती

Rishi Sunakची वाचकांना भूरळ, फक्त 8 दिवसांत तिसरी आवृत्ती

Rushi Sunak Best Seller Book :  ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यावर पत्रकार दिगंबर दराडे यांनी लिहिलेलं पुस्तक बेस्ट सेलर ठरत आहे. अवघ्या पाच दिवसांमध्ये 2000 प्रतींची तिसरी आवृत्ती सुरू करण्यात आली आहे. लंडन येथे जाऊन दराडे यांनी आपल्या पुस्तकामध्ये सुनक यांच्या व्यक्तीमत्वाचे विविध पैलू उलगडले आहेत. युवक युवतींकडून या पुस्तकाला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे डिजिटल माध्यमांमुळे समोर आले आहे.

इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती व सुधा मूर्ती यांचे ते जावई आहेत. ज्या देशाने आपल्यावर दीडशे वर्ष राज्य केले, त्या देशाचा पंतप्रधान एक भारतीय वंशाचा आणि हिंदू आहे. या अभूतपूर्व घटनेने भारतीय म्हणून आपली छाती नक्कीच फुलून येत आहे.

आमदारांच्या अपात्रतेचा अधिकार झिरवळांना कोणी दिला? मंत्री सामंतांनी फटकारले

एक स्थितप्रज्ञ, हिंदू संस्कृतीचा अभिमान बाळगणारे, मंदिरात जाऊन पूजा करणारे गोपूजा करणारे, गीतेवर हात ठेवून खासदारकीची शपथ घेणारे ब्रिटनचे पंतप्रधान पाहून भारतीयाला त्यांचा अभिमान वाटतो आहे. आपले कर्तव्य हाच आपला धर्म आहे हा विचार पक्का करून ते जोमाने कामाला लागले आहेत दिवस-रात्र मेहनत करत आहेत.

माय मिररचे मनोज अंबिके म्हणाले, ऋषी यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकाला चांगला प्रतिसाद मिळत असून आठ दिवसांमध्ये आम्ही तिसरी आवृत्ती काढण्याचा निर्णय घेतला आहे. याच बरोबर हे पुस्तक विविध भाषांमध्ये आणण्याचाही आमचा संकल्प आहे.

महाराष्ट्रातील दंगलीच्या घटना हा BJP चा निवडणूक प्लॅन; ठाकरे गटाच्या नेत्याचा मोठा आरोप

मी ब्रिटिश नागरिक आहे. येथे माझे घर आहे. हा माझा देश आहे परंतु माझा धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा भारतीय आहे. माझी पत्नी भारतीय आहे. मी एक हिंदू आहे आणि याचा मला सार्थ अभिमान आहे.
-ऋषी सुनक

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube