अपघातात जुन्नरचे नायब तहसीलदार अनंता बनाजी गवारी यांचा मृत्यू
Naib Tehsildar Ananta Banaji Gawari : जुन्नर तालुक्यातील बनकरफाटा–जुन्नर मार्गावर भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. गणपती
Naib Tehsildar Ananta Banaji Gawari : जुन्नर तालुक्यातील बनकरफाटा–जुन्नर मार्गावर भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. गणपती फाट्याजवळील एस कॉर्नरवर हायवा आणि कारची समोरासमोर जोरदार धडक होऊन या अपघातात जुन्नरचे नायब तहसीलदार अनंता बनाजी गवारी यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. हा अपघात नेमका अपघात होता की घातपात, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.
महसूल अधिकाऱ्यांची होंडा सिटी कार बनकरफाट्याकडून जुन्नरकडे जात असताना पांगरीमाथ्याकडून येणाऱ्या हायवाची गणपती फाट्याजवळील एस कॉर्नरवर समोरासमोर धडक झाली. धडक इतकी भीषण होती की कार फिरून उलट दिशेला गेली. या अपघातात निवडणूक नायब तहसीलदार अनंता गवारी (वय 52) गंभीर जखमी झाले होते. त्यांना पुढील उपचारासाठी पुण्याकडे नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. तसेच महसूल कर्मचारी विजय खर्तोडे हे गंभीर जखमी असून तुषार कोरडे हे किरकोळ जखमी झाले आहेत.
‘या’ राशींच्या लोकांना होणार आर्थिक नुकसान; जाणून घ्या आजचा दिवस कसा राहणार?
घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिक आणि पत्रकारांच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान, या अपघातामागे नेमके कारण काय, हा अपघात की घातपात, याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.