kasba Bypoll Result : मी सर्वात आधी गिरीश बापटांना भेटणार.. आमदार झाल्यानंतर धंगेकरांनी सांगितले

kasba Bypoll Result : मी सर्वात आधी गिरीश बापटांना भेटणार.. आमदार झाल्यानंतर धंगेकरांनी सांगितले

kasba Bypoll Result : कसबा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाले आहेत. त्यांनी भाजप उमेदवार हेमंत रासने यांचा 11 हजार 40 मतांनी पराभव केला. विजयानंतर धंगेकर यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

वाचा : Kasba By Election : तिथेच आर्धी लढाई जिंकलो, अजित पवारांनी सांगितलं कसब्यातील यशाचं रहस्य

धंगेकर म्हणाले, की मी सुरुवातीपासून सांगत होतो की मीच निवडून येणार आहे. येथे सरळ दुरंगी लढत होती. या विजयानंतर मला राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फोन केला. शुभेच्छा दिल्या. आता मी यानंतर उद्धव ठाकरे यांना भेटणार आहे. तसेच मी सर्वात आधी भाजपचे खासदार गिरीश बापट यांना भेटणार, असे धंगेकर यांनी सांगितले.

भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी आजारी असतानाही भाजप उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी सभा घेतली होती. रासने यांना विजयी करण्याचे आवाहनही बापट यांनी केले होते. रासने विजयी झाल्यानंतर मी सवतः  तुम्हाला भेटायला येईन असे बापट मतदारांना म्हणाले होते. त्यानंतर याची बरीच चर्चा झाली होती. यानंतरही भाजपचा उमेदवार विजयी झाला नाही. काँग्रेसच्या धंगेकरांनी विजय मिळवला. तरी देखील धंगेकर आता बापट यांना भेटणार असल्याचे म्हणत आहेत.

कसबा मतदारसंघात रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा 11 हजार 40 मतांनी पराभव केला. या निवडणुकीत धंगेकरांनी विजय मिळवला. या मतदारसंघात भाजपचे वर्चस्व राहिले आहे. अनेक वर्षांपासून येथे भाजपचाच उमेदवार निवडून येत आहे. त्यामुळे निवडणुकीतील परभव भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. या निवडणुकीसाठी भाजपने पूर्ण ताकद पणाला लावली होती. यावेळची निवडणूक अवघड आहे, याचा अंदाज भाजपला आला होता. त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह स्वतः भाजप खासदार गिरीश बापट आजारी असतानाही प्रचारात उतरले होते. मात्र, तरीसुद्धा येथे भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला. हेमंत रासने यांना पराभव स्वीकारावा लागला आहे.

https://www.youtube.com/watch?v=BERIduaZOvg

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube