Ketan Agrawal : माझ्या मुलाला बळजबरीने कबूल करायला लावलं; चेतनच्या वडिलांचा खळबळजनक दावा…

माझ्या मुलाला बळजबरीने गुन्हा कबूल करायला लावल्याचा दावा आरोपी चेतन चौधरीच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.

Ketan agrawal

Ketan Agrawal : पुण्यातील लोहगडावरुन 24 वर्षीय केतन अग्रवाल (Ketan Agrawal) याला दरीत ढकलून हत्या केल्याच्या प्रकरणात पुणे पोलिसांनी केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि प्रियकर चेतन चौधरीला अटक केलीयं. या प्रकरणी चेतनचे वडिल बाबुलाल चौधरी यांनी खळबळजनक दावा केला असून चेतनचा हत्येशी संबंध नाही, त्याला बळजबरीने कबूल करायला लावल्याचा आरोप चौधरी यांनी केला आहे.

ग्राहकांना मोफत पाणी द्यावंच लागणार! तुकाराम मुंढेंचा हॉटेल्स-रेस्टॉरंट्सना कडक इशारा, नियम मोडणाऱ्यांवर थेट कारवाई

पुढे बोलताना बाबुलाल चौधरी म्हणाले, त्यांच्या कुटुंबाचा सिया गोयल नावाच्या मुलीशी दूरदूरपर्यंत कोणताही संबंध नव्हता. सिया आणि चेतन यांच्यात मैत्री होती किंवा ते एकमेकांसोबत फिरत होते, हे आम्हाला आता पोलिसांनी अटक केल्यानंतर समजले. आमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने आजपर्यंत त्या दोघांना एकत्र पाहिलेले नाही. १८ जून रोजी चेतन लोहगड किल्ल्यावर गेला होता, याची पुसटशी कल्पनाही आम्हाला नव्हती. घरातून निघताना त्याने फक्त एका मीटिंगला जात असल्याचे सांगितले होते, असे बाबूलाल चौधरी यांनी स्पष्ट केले.

Venezueala Earthquake : व्हेनेझुएला दोन भूकंपांनी हादरलं! 10 हजार जणांचा मृत्यू? कॅरिबियन बेटांसाठी त्सुनामीचा इशारा

चेतनला जेव्हा पोलिसांनी घरून ताब्यात घेतले, तेव्हाच या प्रकरणाचे गांभीर्य समजल्याचे वडिलांनी सांगितले. पोलीस स्टेशनमधील भेटीचा संदर्भ देत ते म्हणाले, “जेव्हा आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलो, तेव्हा चेतन मला स्पष्टपणे म्हणाला की, माझा या घटनेशी काहीही संबंध नाही. मी तिथे हजर होतो, हे मला बळजबरीने कबूल करायला लावले आहे. तो तिथे प्रत्यक्षात हजर होता की नव्हता, हे आम्हाला ठाऊक नाही. तिथे गेल्याचे काही पुरावे पोलीस दाखवत आहेत, पण त्याने आम्हाला काहीही सांगितले नव्हते. चेतनवर यापूर्वी कोणताही आरोप किंवा पोलीस केस नाही. घटनेच्या वेळी तो मुख्य स्पॉटपासून काही अंतरावर उभा होता आणि केतन दरीत कोसळला तेव्हा सिया केतनच्या अगदी जवळ उभी होती. पोलिसांनी सुरुवातीला हे प्रकरण किरकोळ असल्याचे सांगितले होते, असाही आरोप त्यांनी केला.

दरम्यान, सुरुवातीला हा अपघात वाटत होता, केतनच्या वडिलांना संशय बळावल्यानंतर पोलिसांनी सिया आणि चेतन चौधरीला ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. चेतन चौधरी आणि सिया गोयल यांचे एकमेकांवर प्रेम होतं. मात्र, सियाचे लग्न केतन अग्रवालसोबत ठरलं होतं. सियाला केतनशी लग्न करायचं नव्हतं. यामुळे या दोघांनी मिळून केतनचा काटा काढण्याचा कट रचला. सियाने केतनला लोहगड किल्ल्यावर फिरण्याच्या बहाण्याने नेलं. नंतर प्रियकर चेतन चौधरी यालाही तेथे बोलावून घेतलं. लोहगड किल्ल्यावर दोघांनी केतनला डोंगरावरून खाली ढकलून दिलं व त्याचा खून केल्याचं चेतनने चौकशीत सांगितलं.

follow us