ज्ञानेश्वर माऊलींचे मानाचे अश्व श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या चरणी; गुरुवारी पालखीचे प्रस्थान

ज्ञानेश्वर माऊलींचे मानाचे अश्व श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या चरणी; गुरुवारी पालखीचे प्रस्थान

Pune News : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीतील मानाच्या अश्वांनी हिंदुस्थानातील पहिला (Pune News) सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी भाविक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली. अंकली (कर्नाटक) येथील श्रीमंत शितोळे सरकार यांचे अश्व अंकली येथून पायी येऊन दरवर्षी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीत सहभागी होत असतात. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात या दोन अश्वांना मानाचे स्थान असते.

उद्या गुरुवारी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. या पालखी सोहळ्यात हे दोन्ही अश्व सहभागी होऊन पंढरपूरपर्यंत जात असतात. वारकरी संप्रदायात १८३२ पासूनची ही समृद्ध परंपरा आहे. पालखी सोहळा मार्गस्थ झाल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज यांच्या रथापुढे जो अश्व असतो तो माऊलींचा अश्व असतो तर जरीपटका घेऊन अश्वस्वार असतो तो स्वाराचा अश्व असतो. असे हे दोन अश्व पालखी सोहळ्यात सहभागी होत असतात.

अंकली येथील शितोळे राजे यांच्याकडे या अश्वांची ही मानाची परंपरा आहे. मंगळवारी या अश्वांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टकडून श्रीमंत उर्जितसिंह राजे शितोळे सरकार, श्रीमंत महादजीराजे शितोळे सरकार यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. ट्रस्टचे अध्यक्ष संजीव जावळे यांच्यासह विश्वस्त, भाविक आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

राज्य सरकारकडून मराठी जणांची फसवणूक; हिंदी भाषा सक्तीचीच, पाहा कसं ठेवलं तुम्हाला अंधारात?

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरीकडे प्रस्थान

जगद्गगुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान झाले. टाळ मृदंगांचा जयघोष.. विठुरायाच्या भक्तीत तल्लीन होऊन नाचणारे वारकरी.. मुखी पांडुरंगाचा जयघोष.. सोबतीला पावसाच्या सरी अशा भक्तीपूर्ण वातावरणात संत तुकाराम महाराजांची पालखी देहूतून मार्गस्थ झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज देहूमध्ये संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची पूजा केली. यावेळी ट्रस्टचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस यांनी पूजा केल्यानंतर पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube