महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; मुंबईसह अनेक जिल्ह्यांना अलर्ट
Maharashtra Rain Alert पावसाचा जोर वाढला. नंदुरबार, धुळे आणि नाशिकला ऑरेंज अलर्ट, तर मुंबई, ठाणे, पालघर आणि इतर जिल्ह्यांना यलो अलर्ट.
Maharashtra Rain Alert: बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आता दक्षिण छत्तीसगडच्या परिसरात दाखल झाले असून, रविवारी हे क्षेत्र विदर्भाच्या दिशेने पुढे सरकण्याची शक्यता आहे. या हवामान प्रणालीमुळे महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. काही ठिकाणी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नंदुरबार, धुळे आणि नाशिकला ऑरेंज अलर्ट, तर मुंबई, ठाणे, पालघर आणि इतर जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
“बापासारखं शरीर कुठून आणणार?”;श्वेता महालेंना प्रत्युत्तर देताना संजय गायकवाडांची जीभ घसरली
नंदुरबार, धुळे आणि नाशिकच्या घाट परिसरात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून या भागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे आणि मुंबईसह इतर काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पावसासोबत ताशी 30 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.
या कमी दाबाच्या क्षेत्राचा सर्वाधिक प्रभाव विदर्भात जाणवण्याची शक्यता आहे. शनिवारी सकाळपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपणा येथे 89 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्याचवेळी सोलापूरमध्ये राज्यातील सर्वाधिक 35 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर महाबळेश्वर येथे 16.5 अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदवण्यात आले.
मनोज जरांगे पाटलांची मुंबईला जाण्याची घोषणा; आमदार रोहित पवारांचा सरकारला महत्वाचा सल्ला
दरम्यान, गणपती बाप्पाच्या आगमनावेळी मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाने पुन्हा जोर धरला आहे. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली परिसरात रात्रीपासून पावसाच्या सरी सुरू असून, रविवारी सकाळीही अनेक भागांत जोरदार पाऊस झाला. काही सखल भागांमध्ये पाणी साचू लागल्याने गणेशोत्सवाच्या तयारीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
मुंबईकर आज बाप्पाच्या आगमनासाठी खरेदी आणि मंडपाच्या तयारीसाठी मोठ्या प्रमाणावर बाहेर पडण्याची शक्यता आहे. मात्र, पावसाचा जोर कायम राहिल्यास बाजारपेठांमध्ये जाणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. सार्वजनिक गणेश मंडळांच्या मंडपांपासून रस्त्यावरील सजावटीपर्यंत अनेक कामांवर पावसाचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
कल्याण-डोंबिवलीतही दीड महिन्यानंतर पावसाचे पुनरागमन झाले आहे. मागील काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे. वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी गणपतीच्या आगमनाची तयारी करणाऱ्या नागरिकांसमोर पावसाचे नवे आव्हान उभे राहिले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 11 ते 14 सप्टेंबरदरम्यान राज्यातील विविध भागांत पावसाची शक्यता आहे. या काळात काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. 15 सप्टेंबरनंतर पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता असून, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे, नाशिक, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत वीजांच्या कडकडाटांसह पाऊस आणि वादळी वाऱ्याचा अंदाज आहे.
‘शेकडो वर्षे सुद्धा MPSC परीक्षा ऑनलाइन होऊ देणार नाही’; रोहित पवारांचा सरकारला थेट इशारा
वसई-विरारमध्ये पावसाचा जोर
वसई-विरारमध्ये रविवारी सकाळपासून पावसाने जोर पकडला आहे. शहरातील अनेक सखल भागांत पाणी साचले असून, वसई, नालासोपारा आणि विरारमधील काही रस्त्यांवर पाणी जमा झाल्याने वाहतुकीसह नागरिकांच्या दैनंदिन हालचालींवर परिणाम झाला आहे. हवामान विभागाने या परिसरासाठी आज आणि उद्यासाठी यलो अलर्ट दिला असून, पुढील दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे.
मोदी, पुतिन, जिनपिंग अन् पेजेशकियन एकाच मंचावर; ब्रिक्समधून भारताच्या ‘स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी’चे दर्शन
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक मंडळांकडून मूर्ती मंडपात आणण्याची तयारी सुरू झाली आहे. तसेच घरगुती गणेशभक्तही बाप्पाच्या स्वागतासाठी अंतिम तयारी करत आहेत. मात्र, पावसामुळे मूर्तीची वाहतूक, मंडप उभारणी आणि सजावटीची कामे करताना अडथळे निर्माण होत आहेत. पावसापासून मूर्ती आणि सजावटीचे साहित्य सुरक्षित ठेवण्यासाठी अनेकांकडून प्लास्टिकचे आच्छादन करण्यात येत आहे. त्यामुळे एकीकडे गणरायाच्या आगमनाचा उत्साह असताना दुसरीकडे पावसामुळे नागरिकांची धावपळ वाढली आहे.