नाशिकनंतर आता पुण्यातील इन्फोसिसमध्ये लव्ह जिहादचा डाव?, मंत्री नितेश राणेंकडून दखल

नाशिक पोलिसांचे विशेष तपास पथक (एसआयटी) या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे.

News Photo   2026 04 14T155117.709

अनेक दिवसांपासून कामाच्या ठिकाणी (Pune) महिलांना लक्ष्य करुन लव्ह जिहादचं जाळं टाकलं जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नाशिकच्या टीसीएस या मोठ्या कंपनीतील लैंगिक छळ आणि धर्मांतराचे प्रकरण ताजे असताना पुण्यातून देखील असाच आरोप करणारी घटना समोर आली आहे. आता इन्फोसिस पुणेच्या एका माजी कर्मचाऱ्याने सोशल मीडियावर खळबळ बाब उघड केली आहे.

इन्फोसिसच्या एका माजी कर्मचाऱ्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री नितेश राणे यांना टॅग करून एक्स या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, पुण्यातील इन्फोसिस कंपनीमध्ये देखील जिहादी छळ सुरु आहे. खास करुन बीपीएमच्या डायमलर प्रोजेक्टमध्ये काम करणाऱ्या अनेक मुली जिहादी छळाला बळी पडत आहेत. असा धक्कादायक आरोप या मेसेजमध्ये करण्यात आला आहे.

 लिप्स्टिक, रोजा, अन् हिंदु मैत्रीणी;नाशिकच्या IT कंपनीत धर्मांतराचा खेळ

संबंधित ट्वीट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यानंतर यावर आता भाजप नेते व मंत्री नितेश राणे यांनी देखील रिप्लाय दिला आहे. तक्रारदाराने भाजप आमदार नितेश राणे यांनाही टॅग केले होते, ज्यावर राणे यांनी तात्काळ प्रतिसाद दिला. राणे यांनी प्रकरणाची दखल घेतली, कर्मचाऱ्याचे आभार मानले आणि पुढील माहितीसाठी थेट संपर्क साधण्याचा सल्ला दिला आहे.

नाशिकमधील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) कंपनीच्या आठ महिला आणि एका पुरुष कर्मचाऱ्यांनी कंपनीमध्ये घडलेल्या धक्कादायक घटना ताज्या आहेत. नाशिकमधील पीडितांचा आरोप आहे की, त्यांचा केवळ मानसिक आणि लैंगिक छळच झाला नाही, तर त्यांच्यावर गोमांस खाण्यासाठी, नमाज पढण्यासाठी आणि इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठीही दबाव आणला गेला आहे.

नाशिक पोलिसांचे विशेष तपास पथक (एसआयटी) या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. तपासात निदा खान ही मुख्य सूत्रधार असल्याचं निष्पन्न झालं आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, निदा खानने तरुण महिला कर्मचाऱ्यांना प्रेमप्रकरणात गुंतवून त्यांचं शोषण केलं. एसआयटीला असे आढळून आले की, पीडितांना त्यांच्या धार्मिक चालीरीती आणि पोशाख बदलण्यासाठीही प्रभावित केले जात होते.

टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन यांनी या वादावर अखेर मौन सोडले आहे. त्यांनी हे आरोप अत्यंत चिंताजनक आणि दुःखद असल्याचं म्हटलं आहे. दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी टीसीएसच्या सीओओ आरती सुब्रमण्यम यांच्या देखरेखीखाली उच्चस्तरीय चौकशी सुरू असल्याचं आश्वासन त्यांनी दिले. आयटी क्षेत्रातील अशा जातीयवादी आणि शोषणाच्या आरोपांमुळे कॉर्पोरेट कार्यसंस्कृती आणि महिलांच्या सुरक्षेबद्दल गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

follow us