Junnar Murder Case : पुण्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन हत्या; नराधम अटकेत

Junnar Murder Case : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात एका 10 वर्षीय मुलीवर अत्याचार करत तिची हत्या करण्यात आल्याची एका धक्कादायक घटना

Junnar Murder Case

Junnar Murder Case : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात एका 10 वर्षीय मुलीवर अत्याचार करत तिची हत्या करण्यात आल्याची एका धक्कादायक घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी 25 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. 10 वर्षीय मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या केल्याची कबुली आरोपी दिली असल्याची माहिती आळेफाटा पोलिसांकडून देण्यात आली आहे.

सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, 10 वर्षीय चिमुकली चौथीत शिकत असून आजारी असल्याने ती शाळेत गेली नव्हती. तसेच तिचे पालक देखील घरी नव्हते मात्र जेव्हा पालक घरी आले तेव्हा मुली घरात नसल्याने त्यांनी तिचा शोध (Junnar Murder Case) घेतला मात्र ती सापडत नसल्याने पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली.

तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस तिचा शोध घेत असताना संशयित आरोपी योगेश पवार (Yogesh Pawar) देखील मुलीचा शोध घेत होता मात्र त्याच्या हालचाली संशयास्पद वाटत असल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी मुलीबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. लेंडे स्थळ परिसरातील एका ओढ्याकाठी झाडाजवळ मुलीचा मृतदेह असल्याची माहिती दिली.

मोठी बातमी, कोलकात्यात हॉटेलला आग; नऊ जणांचा मृत्यू-

घटनेची माहिती मिळताच पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक संदीप गिल यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाचा पंचनामा केला असल्याची देखील माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. तर दुसरीकडे आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी पीडित कुटुंबीयाकडून आणि ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

follow us