आमदार कटकेंच्या गाडीची चार वर्षीय चिमुकलीला धडक; प्रकृती चिंताजनक!
शिरुरचे आमदार माऊली कटके यांच्या गाडीची चार वर्षीय मुलीला धडक बसल्याने अपघात घडल्याची घटना घडलीयं. या अपघातात मुलीची प्रकृती चिंताजनक आहे.
Mla Mauli Katake : पुण्यातील शिरुर मतदारसंघाचे आमदार माऊली कटके (Mla Mauli Katake) यांच्या गाडीने चार वर्षीय मुलीला धडक दिल्याची घटना काल रात्रीच्या सुमारास घडलीयं. या घटनेत चार वर्षीय चिमुकलीला गंभीर दुखापत झाली असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे. सध्या या चिमुकलीवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
आमदार माऊली कटके हे शिरुर नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी पुण्यातून शिरुरकडे निघाले होते. त्यावेळी शिरुरकडे निघालेल्या कारची 4 वर्षीय मुलीला धडक बसली. शिरुरच्या बोराडे मळा परिसरात हा अपघात घडला असून शुभ्रा पंढरीनाथ बोराडे असं या अपघातात जखमी झालेल्या मुलीचं नाव आहे.
मला माझ्या मर्यादा माहिती असल्याने…, मुख्यमंत्री पदाच्या वादावर डी. कें शिवकुमारांचं मोठं विधान
हा अपघात घडल्यानंतर आमदार माऊली कटके यांच्या कार्यकर्त्यांना त्यांना दुसऱ्या गाडीतून शिरुरला पोहोचवलं. या अपघातात मुलीचे दातं पडले असून जबड्याला जबर मार लागला आहे. जखमी मुलीची प्रकृती चिंताजनक असून सध्या पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
