धक्कादायक! पुण्यात सेवानिवृत्त अधिकाऱ्याची आत्महत्या, बिल्डरणे फसवल्याने होते नैराश्यात

सेवानिवृत्तीनंतर त्यांनी बाणेर परिसरातील त्यांची मालकीची जमीन बिल्डर जयंतीलाल ओसवार यांना रिडेव्हलपसाठी दिली होती.

  • Written By: Published:
News Photo   2026 02 24T160347.289

पुणे शहरातील बाणेर परिसरात बिल्डरकडून फसवणूक (Pune) झाल्याच्या नैराश्यातून एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी बाणेर पोलिसांनी बिल्डर जयंतीलाल ओसवाल आणि ऋषभ ओसवाल यांच्याविरुद्ध फसवणूक आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नरेश उमाकांत असं आत्महत्या केलेल्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यातं नाव आहे. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी बाणेर परिसरातील त्यांची मालकीची जमीन बिल्डर जयंतीलाल ओसवार यांना रिडेव्हलपसाठी दिली होती. या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाजन आणि बिल्डर यांच्यात झालेल्या करारानुसार बांधकाम पूर्ण झाल्यानंतर महाजन यांना ठराविक सदनिका देणं बंधनकारक होतं. मात्र, दिर्घकाळ उलटून गेल्यानंतरही बिल्डरकडून सदनिका देण्याबाबत टाळाटाळ करण्यात आली होती.

भाजप-काँग्रेस संघर्ष पुन्हा पेटणार! पुण्यात भाजपच्या कार्यकर्त्यांचा काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवारांवर हल्ला

या प्रकरणाचा वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कारवाई किंवा प्रतिसाद मिळत नसल्याने महाजन मानसिक आणि नैराश्यात होते. यानंतर बिल्डरला दिलेल्या अर्धवट बांधकामाच्या इमारतीवरतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली. बिल्डरच्या मानसिक त्रासामुळे उमाकांत महाजन यांनी आत्महत्या केली.

घटनास्थळी सुसाईड नोटमध्ये बिल्डरकडून झालेल्या फसवणुकीमुळे आणि मानसिक त्रासामुळे आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचं नमूद केलं. या प्रकरणी कुटुंबियांनी तीव्र संताप व्यक्त केला, तसंच बिल्डरवर कठोर कारवाई करण्याची आणि तात्काळपणे अटक करण्याची मागणी केली आहे. बाणेर पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरु केला आहे.

follow us