वळसे पाटलांचं शिरुरवर लक्ष; गावभेटी अन् सभांचा धडाका, नागरिकांशी संवाद..

वळसे पाटलांचं शिरुरवर लक्ष; गावभेटी अन् सभांचा धडाका, नागरिकांशी संवाद..

Pune News : विधानसभा निवडणुकीत प्रचाराचा धुराळा उडू लागला आहे. स्टार प्रचारक आणि नेत्यांच्या सभा होत आहेत. तर दुसरीकडे उमेदवार देखील थेट मतदारांच्या भेटी घेत आहेत. अजित पवार गटाचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांनीही मतदारसंघातील गावांत जात नागरिकांशी संवाद साधला. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई, चिंचोली मोराची, निमगाव भोगी व ढोकसांगवी या गावांना दिलीप वळसे पाटील यांनी भेट दिली. यावेळी आयोजित कोपरा सभेला उपस्थित राहून ग्रामस्थांशी संवाद साधला.

मागील ३५ वर्षांच्या कारकिर्दीत जनतेने मोठ्या विश्वासाने साथ दिली. मतदारसंघातील जनतेच्या विकासाला मी नेहमीच प्राधान्य दिले. शिरूर तालुक्यातील ही ४२ गावे २००९ पासून आंबेगाव मतदारसंघात समाविष्ट झाली आहेत. विकासाच्या सर्व सोयी सुविधा या भागात पोहचविण्याचा आमचा प्रयत्न राहिला आहे. मागील ३५ वर्षांच्या कार्यकाळात केवळ आणि केवळ विकासाला महत्व दिले ते सर्वांनाच माहिती आहे.

शिक्षणसंस्थांचे मोठे जाळे मतदारसंघात निर्माण झाले आहे. शासकीय कार्यालये अद्ययावत झाली आहेत. आरोग्य व्यवस्था देखील सुधारली आहे. आगामी काळात प्रस्तावित असलेले रुग्णालय देखील पूर्ण केले जाईल. रस्त्यांचे विस्तृत असे जाळे निर्माण झाले असून वाहतूक कोंडीची समस्या सुटली आहे.पुढील काळात या पद्धतीची कामे मार्गी लावू, असा विश्वास त्यांनी ग्रामस्थांना दिला.

अवसरीला मेडिकल कॉलेज सुरू करणार; दिलीप वळसे पाटलांची मोठी घोषणा

शिरूर तालुक्यातील ४२ गावे आंबेगाव मतदारसंघात समाविष्ट झाल्यापासून तीन निवडणुका झाल्या आहेत. आपण दाखवलेल्या विश्वासाने व पाठिंब्यामुळे मागील १५ वर्ष मी आपल्या भागाचे प्रतिनिधित्व केलं आहे. मागील ३५ वर्षांच्या कार्यकाळात मंत्री म्हणून संधी मिळाली तेव्हा आंबेगाव-शिरूर मतदारसंघातील प्रत्येक गावाकडे बारकाईने लक्ष देण्याचा प्रयत्न केल्याचे वळसे पाटील म्हणाले.

शिरूर तालुक्यातील या ४२ गावांकडे जास्त लक्ष दिलं कारण बरेच वर्ष इकडची कामे प्रलंबित होती आणि यापुढील काळात आपल्याला त्यादृष्टीने कामे करायची आहेत व आपण ती करणार आहोत, असा विश्वास त्यांनी उपस्थित ग्रामस्थांना दिला. मागील काळात साथ दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले आणि आगामी निवडणुकीत मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

राज्य सरकारच्या योजनांचा सर्वांनाच फायदा

राज्य सरकारच्या योजनांचं कौतुक करताना दिलीप वळसे पाटील म्हणाले, राज्य सरकारने जनतेच्या हिताच्या अनेक योजना काढल्या. लाडकी बहिण योजनेने महिलांना चांगली मदत झाली. सरकारच्या योजनांचा आज राज्यातील महिला, मुली, युवक, ज्येष्ठ नागरीक सर्वांना फायदा होत आहे. आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ केली आहे. या योजनांचा सगळ्यांनाच फायदा झाला आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कर्जाचाही अनेकांना फायदा होत आहे. गावातल्या गोरगरीब जनतेला या योजनेचा लाभ मिळवून देण्याचे काम सर्वांनी केलं पाहिजे असे वळसे पाटील म्हणाले.

बच्चू कडूंच्या प्रहारचा वळसे पाटलांना पाठिंबा; विकसनशील नेतृत्व म्हणत आंबेगावात ताकद वाढवली

सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला

आज शिरूर तालुक्यात एवढा ऊस आहे पण कारखाना चालवू शकत नाही. आपण मात्र शिरूरचा असो किंवा आंबेगावचा ऊस असो सारखाच भाव दिला. साखरही सारखीच दिली. आपण कारखाना काढला, यंदा 3200 रूपये बाजारभाव दिला. पण टीका करण्याच्या भूमिकेतून विरोधक भाव वाढून मागत आहेत. जिथं शेतीला पाण्याचा प्रश्न उद्भवतो तिथे त्या भागाला वाचविण्याचे काम शिक्षण करत असते. सर्व लोकांना शिक्षण कसं मिळेल याबाबत आपण लक्ष ठेवले पाहिजे असे दिलीप वळसे पाटील म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube