अपत्य परमेश्वर, अल्लाची कृपा नसते ‘ती’ तर… अजित पवारांनी लोकसंख्येवरून फटकारले!
Ajit Pawar : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एका मुलाखतीमध्ये जोरदार राजकीय फटकेबाजी केली. एका राजकीय प्रश्नाला उत्तर देताना अजित पवारांनी देशातील वाढत्या लोकसंख्येला हात घातला. वाढत्या लोकसंख्येला अटकाव घातला पाहिते. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रयत्न केले पाहिजे. कठोर पावले उचलली पाहिजे, असे अजित पवार म्हणाले. त्याचबरोबर लोकसंख्येवर मिश्किल टोलेबाजी केली आहे.
चव्हाण, ठाकरेंना अजिबातच अनुभव नव्हता, अजित पवार असं का म्हणाले?
अजित पवार म्हणाले, देशात आता लोकसंख्येत पहिल्या क्रमांकावर आला आहे. चीनला मागे टाकले आहे. आता बास झाले आहे. लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी राजकीय नेत्यांना, सर्व मुख्यमंत्र्यांनी कठोर पावले उचलली पाहिजे. १९४७ मध्ये ३२-३३ कोटी लोकसंख्या होती. आता २०२३ मध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या झाली आहे. हा देशाचा नावलौकिक आहे का अस म्हणत पवार यांना टोला लगावला आहे.
कुठल्याही जाती, धर्मामध्ये, पंथामध्ये किती मोठ्या प्रमाणात लोकसंख्येवर वाढविले पाहिजे हे सांगितले नाही. अपत्य परमश्वेर, अल्लाची कृपा नसते. ही नवरा, बायकोची कृपा असते. हे मान्य केले पाहिजे. अंधश्रद्धा डोक्यातून काढून टाकली पाहिजे. मुलीचा सन्मान केला पाहिजे. दोन्ही मुली झाल्या तरी बिघडत नाही. मुली बापाचे नाव काढतात. तर पोरग नाव घालवतो, असे अजित पवार म्हणाले.
उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याबाबत माहिती होते का? अजित पवार म्हणाले…
याबरोबर संजय गांधी यांची लोकसंख्या नियंत्रणाबाबतची आठवण अजित पवारांनी सांगितले. आपल्यात आता संजय गांधी नाहीत. पण त्यांच्याबरोबरच काही लोक आहेत. त्याचवेळा पाच कलमी कार्यक्रम राबविला असता तर लोकसंख्या वाढली नसती. सर्वांत तरुण देश असल्याचे आपण फुशारकी मिरवतो. पुढच्या पिढ्या आहेत. त्याचे आत्मचिंतन करा. त्यामुळे लोकसंख्येसाठी कठोर निर्णय घेतले पाहिजे, असे अजित पवार म्हणाले.
Ajit Pawar : ‘ते’ जबरदस्त काम आता केले असते, तर ठाकरे मुख्यमंत्री असते