अजित पवारांचा पुण्यातील शिलेदार ठरला; दीपक मानकरांकडे मोठी जबाबदारी!

अजित पवारांचा पुण्यातील शिलेदार ठरला; दीपक मानकरांकडे मोठी जबाबदारी!

NCP Political Crisis :  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे शहर अध्यक्षपदी दीपक मानकर यांची निवड प्रदेशाध्यक्ष खा. सुनील  तटकरे यांनी केली आहे. याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दीपक मानकर यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचे अभिनंदन केले. अजित पवार यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर दोन्ही गटांकडून नवीन नियुक्त्या केल्या जात आहे. ( Deepak Manakar Join Ajit Pawar Camp )

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप हे अजित पवारांच्या जवळचे मानले जायचे व दीपक मानकर हे शरद पवार यांचे समर्थक मानले जायचे मात्र अजित पवारांच्या बंडा नंतर झालं उलटच प्रशांत जगताप हे शरद पवारांच्या सोबत आहेत तर दीपक मानकर अजित पवार यांच्या गटासोबत गेले आहेत यामुळे देखील आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

NCP : मी राष्ट्रीय अध्यक्ष, शरद पवारांना बैठक घेण्याचा अधिकारच नाही : अजितदादा आता पूर्णपणे भिडले

अजित पवार यांनी 40 आमदारांच्या सह्यांचे पत्र निवडणूक आयोगाकडे दिले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा केला आहे. तसेच बहुमताने अजित पवार यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून नेमल्याचेही त्या पत्रात म्हटले आहे. त्यानंतर अजित पवार व शरद पवार या दोन्ही गटाकडून नवीन नेमणुका करण्याचे काम जोरदार सुरु आहे.

WhatsApp Image 2023 07 06 At 5.32.00 PM

WhatsApp Image 2023 07 06 At 5.32.00 PM

अजित पवार यांच्याकडून जयंत पाटील यांच्याऐवजी सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर तटकरे यांनी अनेक नवीन नेमणुका केल्या आहे. रुपाली चाकणकर यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्य महिला प्रदेशाध्यक्षपदी नेमणूक केली आहे.

‘मीच राष्ट्रवादीचा अध्यक्ष, माझ्याकडे किती आमदार लवकरच कळेल’; पवारांनी ठणकावलं!

दरम्यान,  पुणे पोटनिवडणुकीत प्रशांत जगताप यांनी लोकसभा लढवण्याची तयारी दाखवल्यानंतर दीपक मानकर यांनी देखील लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. दीपक मानकर यांचा  दांडगा जनसंपर्क, कोरोना काळात केलेली कामे, युवकांचे सोडवलेले अनेक प्रश्न या मानकर यांच्या जमेच्या बाजू आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube