Pune जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अनेक वर्षांनी शरद पवारांची एन्ट्री; “मला घाई नाही” म्हणतं 2 तास उपस्थिती

Pune जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अनेक वर्षांनी शरद पवारांची एन्ट्री; “मला घाई नाही” म्हणतं 2 तास उपस्थिती

पुणे : जिल्हा नियोजन समितीची आजची बैठक चांगलीच चर्चेत राहिली. याचं मुख्य कारण ठरलं ते राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अनेक वर्षांनी बैठकीला लावलेली उपस्थिती. आज (१९ मे) पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या नेतृत्वात पुणे (Pune) जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीला अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे,आमदार चेतन तुपे, आमदार सुनील टिंगरे, आमदार सुनील शेळके, आमदार दत्तात्रय भरणे, शिंदे गटाचे नेते माजी मंत्री विजय शिवतरे, भाजपचे नेते माजी मंत्री बाळा भेगडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. (NCP President Sharad Pawar attend Pune District Planning Committee meeting after many years)

अशात शरद पवार यांचीही या बैठकीत उपस्थिती पाहायला मिळाली. पवार यांची उपस्थिती सर्वच लोकप्रतिनिधी अन् अधिकाऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरली. अगदी अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांनाही त्यांच्या उपस्थितीचे कोडं उलगडलं नाही. अजित पवार म्हणाले, अनेक वर्षांनी पहिल्यांदा पवार साहेब जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला आलेले पाहिले. अनेक वर्ष मी पण पालकमंत्री म्हणून काम करतोय. ते का आले ते मी सुप्रियाला विचारले, ती म्हणाली, मिटिंग कशी चालते हे बघायला आले असावेत. पण त्यांनी फक्त ऐकण्याची भूमिका घेतली. ते जास्त बोलले नाहीत.

Video : “पोपट, मैना अन् मोर… : ‘मविआ’च्या मारलेल्या पक्षांना जिवंत करत अजितदादांची फटकेबाजी

दरम्यान, शरद पवार यांच्या उपस्थितीवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, शरद पवार यांची उपस्थिती आनंद देणारी होती. मला वाटलं ते फक्त हजेरी लावून जाणार आहेत. म्हणून मी म्हंटलं की, आज पवार साहेबांनी वेळ काढला आहे, त्यामुळे बैठक लवकर संपवूया. त्यावर ते म्हणाले की, मला घाई नाही. त्यांनी पाऊणे दोन तासांपेक्षा जास्त ते उपस्थित होते. ते प्रत्यक्ष बोलले नाहीत. पण बैठकीत रस घेऊन त्यांनी कोणी काही मांडलं की मला किंवा विभागीय आयुक्तांना विचारुन त्या-त्यावेळी ते स्पष्टीकरण घेत होते. त्यामुळे त्यांची उपस्थिती ही माझ्यासाठी आनंदाची आणि आश्चर्याची बाब होती.

Pune : शरद पवारांसमोरच अजित पवारांची ‘दादागिरी’; भर बैठकीत चंद्रकांत पाटलांना धरलं धारेवर

बैठकीत काय घडलं?

आजच्या बैठकीत आमदारांचा निधी आणि थकविलेली बिल यावरुन अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना चांगलचं धारेवर धरलं. तीन-चार लाख लोकांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांना निधीची कमतरता भासत आहे, बिलं रोखली जात आहेत. त्यामुळे मतदारसंघातील प्रश्न तडीस जात नसल्याचा मुद्दा अजित पवारांनी चंद्रकांत पाटील यांच्यासमोर उपस्थित केला. तसंच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करुन तातडीने हे प्रश्न सोडवावे अशी मागणी केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube