मोठी दुर्घटना: पुण्यात कुंडेश्वर दर्शनाला जाणाऱ्या पिकअपचा अपघात, 9 महिला भाविकांचा मृत्यू

मोठी दुर्घटना: पुण्यात कुंडेश्वर दर्शनाला जाणाऱ्या पिकअपचा अपघात, 9 महिला भाविकांचा मृत्यू

Accident Pune : श्रावण महिन्यातील आज तिसऱ्या सोमवारनिमित्ताने शिव मंदिरात (Pune) भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. पुणे जिल्ह्यात भीमाशंकर हे मोठे ज्योतिर्लिंग असल्याने येथेही भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी करत आहेत. त्यासोबतच, अनेक शिव मंदिराकडे वाहनांच्या व भाविकांच्या रांगा दिसून येतात. दरम्यान, भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.

जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील कुंडेश्वर दर्शनाला जाताना भीषण अपघात झाला असून या दुर्दैवी घटनेत 9 महिला भाविकांचा मृत्यू झाला आहे. तसंच, या घटनेत 30 ते 35 महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. साधारणत: दुपारी सव्वा एक वाजताच्या सुमारासचा हा अपघात घडल्याची माहिती आहे. तर, दुसरीकडे कल्याण-पुणे एसटी बसचे चाक निखल्यानेही अपघाताची घटना घडली. श्रावण महिन्याच्या तिसऱ्याया सोमवार निमित्ताने दर्शनासाठी भाविकांच्या वाहनाला अपघात झाल्याची घटना घडली.

INDIA Alliance March : मोठी बातमी, राहुल गांधी; संजय राऊत दिल्ली पोलिसांच्या ताब्यात

खेड तालुक्यातील कुंडेश्वर येथे दर्शनाला जात असताना, नागमोडी वळणावर घाट चढताना गाडी रिटर्न आल्याने महिला भाविकांची पिकअप जीप पलटली, विशेष म्हणजे या पिकअपने 5 ते 6 पलटी खाल्ल्यानं त्यातील 25 ते 30 महिला भाविक गंभीर जखमी झाल्या आहेत. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती असून जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे. अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतीसाठी प्रयत्न केल्याचं दिसून आलं.

कल्याणवरून माळशेजमार्गे पुणे शिवाजीनगरकडे जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसला आज सकाळी मोठा अपघात झाला. कल्याणपासून काही अंतरावर बसचे चाक अचानक निखळल्याने गोंधळ उडाला. या दुर्घटनेत 3 ते 4 प्रवाशांच्या डोक्याला मार लागून ते जखमी झाले आहेत. बसमध्ये अपघातावेळी 40 पेक्षा अधिक प्रवासी होते. प्रत्यक्षदर्शी प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, बस माळशेज घाटापूर्वीच थांबल्याने मोठा अनर्थ टळला. जर, हा प्रकार घाटामध्ये झाला असता, तर गंभीर जीवितहानी होण्याची शक्यता होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube