आळंदीमधील शाळा होणार बंद? ‘या’ आजाराचा वाढला प्रादुर्भाव; आतापर्यंत 1560 प्रकरणे समोर
पुणे : आळंदी शहरामध्ये सध्या वातावरणातील बदलामुळे डोळे येण्याच्या (कंजंक्टिव्हायटिस) (Conjunctivitis) आजाराचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत चालला. जवळपास या आजाराची 1560 प्रकरणे समोर आली. अनेक शाळकरी मुलांनाही या साथीच्या आजाराला सामोरे जावं लागत आहेत. त्यामुळे आळंदी नगरपरिषदेसह (Alandi Municipal Council) पुणे महानगरपालिका प्रशासनाकडून या आजाराचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. (Prevalence of conjunctivitis increased in Alandi)
या आजाराचा प्रादूर्भाव प्रामुख्याने आळंदीमध्ये वारकरी शिक्षण संस्थामध्ये प्रशिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आढळून येत आहे. मागील 4 दिवसांमध्ये जिल्हा प्रशासनाच्या वतीने वारंवार तपासणी केल्या जात असून यामध्ये एक हजार 560 प्रकरणे आढळून आली आहे.
दरवर्षीच पावसाळा सुरू झाल्यानंतर प्रादुर्भाव होणाऱ्या आजारांवर नियंत्रण ठेवण हे एक आरोग्य विभागासमोर मोठा आव्हान असतं. यंदा डोळ्याच्या आजाराने आळंदी देवाची शहरांमध्ये झपाट्याने प्रादुर्भाव होत असल्याने पुणे पालिका व आळंदी नगरपरिषद प्रशासनाने तत्काळ दखल घेत यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पावलं उचलायला सुरुवात केली आहे.
‘हे फार अभ्यास करुन आलेत’; गुलाबराव पाटील अन् आदित्य ठाकरे सभागृहातच भिडले
दरम्यान, आळंदी नगरपरिषदेच्या हद्दीत गेल्या चार दिवसांपासून या आजाराचा प्रादुर्भाव वाढत असून सोमवारी (ता. 17 जुलै) 450 प्रकरणे समोर आली. त्यानंतर मंगळवारी 740 , बुधवारी 210 तर गुरुवारी 160 प्रकरणे समोर आली आहे. या चार दिवसात एकूण एक हजार 560 प्रकरणे आढळून आली आहेत.
याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद म्हणाले, आळंदी नगरपरिषदेच्या हद्दीत ज्या विविध शैक्षणिक संस्था आहे. त्याठिकाणी असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये डोळ्यांच्या बुबुळाच प्रादुर्भाव आढळून आलेला आहे. जिल्हा प्रशासनाच्या जेव्हा हा प्रकार समोर आला तेव्हा तात्काळ याची दखल घेण्यात आली आहे. सर्वांची तपासणी करण्यात आली असून आज एनआयव्हीचे एक पथक सिव्हिल सर्जनसह आळंदीला भेट देणार आहे. तसेच, पुढील उद्रेक टाळण्यासाठी सर्व खबरदारीच्या उपाययोजना केल्याचं आयुष प्रसाद म्हणाले.
ते पुढे म्हणाले, आज आढळलेल्या नवीन प्रकरणांची संख्या कमी झाली नाही तर आम्ही शाळा बंद ठेवण्याचा प्रस्ताव देऊ तसेच पिंपरी-चिंचवड आणि लगतच्या ग्रामपंचायतींनाही सर्व घरांची तपासणी करण्यास सांगितले आहे. आळंदी ग्रामीण रुग्णालयात दोन नेत्रतज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली असून सर्व मुलांना केस पेपर फ्री केले आहेत. संस्थाप्रमुखांना मुलांना घरी पाठवण्याबाबत बोललो आहे. याबरोबरच योग्य ती खबरदारी घेण्यात येत असल्याचंही आयुष प्रसाद यांनी सांगितले.