“देवेंद्रजी, तुम्ही अन् भाजपवाले पटाईत, ईडीत कुणाला फसवायचं हे चांगलं जमतं”, बच्चू कडूंचा घणाघात

Bacchu Kadu Criticized Devendra Fadnavis : प्रहारचे नेते आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी राज्यातील सध्याच्या घडामोडींचा उल्लेख करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर घणाघाती टीका केली. देवेंद्रजी तुम्ही आणि भाजपवाले पटाईत आहात. ईडीमध्ये कुणाला फसवायचं? लोकांना कसं सत्तेत घ्यायचं? तिथं जे कौशल्य वापरता ते या आरक्षणाच्या बाबतीत का वापरत नाहीत. कुणी कुणाचे हक्क हिसकावू नये अशी व्यवस्था निर्माण करा अशी टीका बच्चू कडू यांनी केली आहे. बच्चू कडू यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.
कडू पुढे म्हणाले, राजकारण जाती धर्मावर (Bacchu Kadu) करायचं आणि व्यवस्थित समीकरण जुळवायचं हे त्यांचं राजकारण सुरू आहे. केंद्रात आणि राज्यात सत्ता असतानाही देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) राज्यातील शेतकऱ्यांसाठी काय केलं हे सांगावं असा सवाल कडू यांनी विचारला. आरक्षणाच्या मुद्द्यावरून गावागावात वाद होऊ नयेत. केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी तुमची सत्ता आहे. ओबीसी आणि मराठा समाजाच्या नेत्यांना बोलावं. यात कुणाचंही वाईट होऊ नये. कुणी कुणाचं हिसकावू नये अशी व्यवस्था निर्माण करा अशी अपेक्षा बच्चू कडू यांनी व्यक्त केली.
मराठवाड्यात या शेतकरी म्हणून संबोधित करा; बच्चू कडूंकडून राज ठाकरेंना शेतकरी यात्रेचं निमंत्रण
फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं?
राज्यात शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. शेतमालाला भाव मिळत नाही. परंतु, शेजारच्या छत्तीसगड सारख्या राज्यात शेतमालाला 3100 रुपये क्विंटल हमीभाव मिळतो. यापेक्षा कमी दर आपल्या राज्यात मिळतो. छत्तीसगडमध्ये एक एकरात 12 ते 13 हजार रुपये दर देतो. महाराष्ट्रात मात्र हेक्टरमागे 15 हजार रुपये देतो एवढी मोठी तफावत आहे. मुख्यमंत्री विदर्भातील आहेत. तरीदेखील इथला कापूस, तूर, भात उत्पादक शेतकरी मरतोय. केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे ह्यांची सत्ता आहे. मग देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी काय केलं हे त्यांनी सांगावं, असा सवाल बच्चू कडू यांनी विचारला.