पिंपरी : बारावीच्या परीक्षेत नापास झाल्याने विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पिंपरी चिंचवड येथील दापोडी परिसरात काल गुरुवारी (ता. 25) दुपारी घडली आहे. साक्षी राम कांबळे (वय 18, रा. गुलाबनगर, दापोडी. मूळगाव उमरगा), असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती दापोडी येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात वाणिज्य शाखेत शिक्षण घेत होती. Ahmednagar : देवेंद्र फडणवीसांच्या […]
Chandrakant Patil : पालखी सोहळ्यातील प्रश्न सोडवण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली दोन समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यातील एक समिती पालखी सोहळा पूर्ण होईपर्यंत दर आठवड्याला नियोजन करेल तसेच पुढील वर्षभरात करण्यात येणाऱ्या उपाययोजना संदर्भात दुसरी समिती नियोजन करणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील पाटील यांनी दिली. पालखी सोहळा आढावा बैठक गुरुवारी (दि.25) पाटील यांच्या अध्यक्षतेखाली […]
New Education Policy : विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्ताराचे वजन आता हलके झाले आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरी ते आठवीपर्यंतच्या पुस्तकांची रचना बदलली आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने नवीन पुस्तकांची निर्मिती केली आहे. यामध्ये प्रत्येक इयत्तानिहाय सर्व विषयांचे चार भाग करण्यात आले असून तीन ते चार विषयांसाठी एकच पुस्तक राहणार आहे, अशी […]
Pune Fire : पुण्यातील भवानी पेठ येथील टिंबर मार्केट मधील लाकूड साहित्याच्या सात ते आठ गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. तर या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे. अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, टिंबर मार्केट येथील रामोशी गेट जवळ असलेल्या लाकूड सामान असलेल्या सात आठ गोडाऊनला पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमाराम भीषण आग […]
Pune News : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA ) आयकरात सूट मिळविण्याची लढाई जिंकली आहेत. त्यामुळे पीएमआरडीएकडे बचत होणारा निधी स्थानिक विकास कामांसाठी वापरता येणार आहे. हा निधी एक हजार ते अकराशे कोटी इतका आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयाची स्थापना ३१ मार्च २०१५ रोजी झाली आहे. या प्राधिकरणास शासनाकडून कोणतेही अनुदान […]
Ram Shinde On Cabinet Expansion : सत्तासंघर्षाच्या निकालानंतर राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे जाहीर केले आहे. मुख्यमंत्री शिंदे गटाकडून इच्छुकांची संख्या जास्त आहे. तसेच भाजपमध्ये अनेक दावेदार आहे. आता या दावेदारीबाबत आमदार राम शिंदे हे स्पष्टचं बोलले आहेत. Maharshtra Politics : […]