‘धीरज घाटेंनी हिंदू समाजाची मक्तेदारी घेतलेली नाही’; पुण्यात भाजप-काँग्रेस आमने सामने

‘धीरज घाटेंनी हिंदू समाजाची मक्तेदारी घेतलेली नाही’; पुण्यात भाजप-काँग्रेस आमने सामने

Pune News : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी संसदेच्या अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना हिंदू समाजाबद्दल भाष्य केलं. त्यावरुन देशभरात काँग्रेस आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली असल्याचं दिसून येत आहे. पुण्यातही राहुल गांधी यांच्या विधानाचे पडसाद उमटत आहेत. पुण्यात राहुल गांधी यांचे बॅनर लावत त्यांच्या फोटोवर क्रॉस मारण्यात आल्याचा प्रकार घडलायं. त्यावरुन पुणे काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे (Arvind Shinde)मोहन जोशींना खासदार करणार का?; अरविंद शिंदे म्हणाले… यांनी आक्रमक पवित्रा घेतलायं. धीरज घाटे (Dhiraj Ghate) यांनी हिंदू समाजाची मक्तेदारी घेतलेली नसल्याचा टोला शिंदे यांनी लगावलायं.

अरविंद शिंदे म्हणाले, लोकसभेत राहुल गांधी यांनी जे विधान केलं आहे. ते हिंदू समाजाबद्दल केलेलं नाही. हिंदू हा हिंसक नसतो, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप, आरएसएस म्हणजे समस्त हिंदू नाही. जो स्वत:ला हिंदू म्हणतो तो कधीच दुसऱ्यावर अत्याचार करीत नाही. त्यामुळेच राहुल गांधी यांनी महादेवाचा फोटो हातात घेऊन दाखवला, मात्र, भाजपचे लोकं जे वागत आहेत ते आम्हाला मान्य नसल्याचं अरविंद शिंदे यांनी स्पष्ट केलंयं.

Video : लाडकी बहीण योजनेतील बदल, स्मार्ट मीटर, अन्…; फडणवीसांनी सभागृहात काय काय सांगितलं….

दरम्यान, राहुल गांधी यांच्या विधानानंतर पुण्यात भाजपकडून निषेध व्यक्त करण्यात आला होता. यावेळी धीरज घाटे यांनी पुणे काँग्रेसचे अध्यक्ष मद्य पिऊन बोलत असल्याची सडकून टीका केली होती. त्यावर बोलताना अरविंद शिंदे यांनी घाटे यांना खुलं आव्हानच दिलंय. ते म्हणाले, घाटेंनी सांगावं आणि इथे येऊन बोलावं. घाटे स्वत:च्या कर्मांमुळे कधीच एकटे फिरु शकत नाहीत. त्यांना पोलिस संरक्षणाची गरज लागते त्यामुळे त्यांना काँग्रेस आणि माझ्याबद्दल बोलण्याचा अधिकार नसल्याचं शिंदेंनी स्पष्ट केलंय.

तसेच आम्ही पुन्हा सांगतो की, राहुल गांधींनी जे सांगितलं ते भाजप मोदी आरएसएस हे समस्त हिंदू नाहीत असं सांगितलं आहे. जो हिंदू आहे तो कधीच द्वेष करीत नाही जे गांधी बोलले तेच आम्ही बोलतो आहे. त्यामुळे घाटेंनी हिंदू समाजाची मक्तेदारी घेतलेली नाही त्यांना एकटेसुद्ध फिरता येत नाही त्यांच्या कर्मामुळे त्यांना बॉडीगार्ड लागतात, अशी सडकून टीकाही त्यांनी यावेळी केलीयं.

अरविंद शिंदे यांनी घाटे हे एकटे फिरले तर त्यांची हत्या होईल असंही विधान केलं होतं. त्यावरही शिंदे यांनी पुन्हा भाष्य केलंय. धीरज घाटे हे बॉडीगार्ड घेऊन फिरले नाही तर त्यांनी हत्या होईल. त्याचं कारण म्हणजे त्यांनीच पोलिसांकडे माझ्या जीवाला धोका असल्याचं पत्र दिलं होतं. आता त्यांना कोणत्या कर्मामुळे जीवाला धोका आहे, याबद्दल त्यांनीच उत्तर द्यावं, असंही शिंदे म्हणाले आहेत.

दरम्यान, पोलीस संरक्षणात तुला फिरावं लागतं आणि त्यामुळे जी कर्म कराल ते भोगावं लागतं अशा प्रकारचे अरविंद शिंदे यांनी विधान केल्याने नव्या वादाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे हे असंख्य कार्यकर्त्यांसह काँग्रेस भवन समोर येऊन निषेध आंदोलन करणार आहेत. त्यामुळे काँग्रेस भवन परिसरात चोख पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube