Pune Election : तयारीला लागा! फडणवीस स्वतः पुण्यात लक्ष घालणार; कार्यकर्त्यांना सूचना

  • Written By: Published:
Pune Election : तयारीला लागा! फडणवीस स्वतः पुण्यात लक्ष घालणार; कार्यकर्त्यांना सूचना

Pune Coporation Election : आगामी काळात होणाऱ्या पुणे महापालिकेच्या निवडणुकांसाठी जोरदार हालचाली सर्वच पक्षांकडून सुरू करण्यात आल्या आहेत. येत्या काहीच दिवसात राज्यातील प्रमुख महापालिकांच्या निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावन्नकुळे यांनी 100 पेक्षा अधिक नगरसेवक निवडणून आणण्याच्या तयारीला लागा असे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत.

Pune Loksabha : मेधा कुलकर्णी यांनाही व्हायचंय खासदार; भाजपच्या निर्णयाकडे लक्ष

सध्या पुणे महापालिकेसह अन्य महत्त्वाच्या महापालिकांवर वर्षभरापेक्षा अधिक काळापासून प्रशासकराज आहे. त्यामुळे रखडलेल्या महापालिका निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यात आता बावनकुळे यांनी वरील आदेश दिल्याने येत्या काळात या निवडणुकांचे बिगुल वाजण्याच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे. पुण्यात चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली भाजपची महाबैठक पार पडली यामध्ये बावनकुळे यांनी महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत.

जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवारांना बाप मानले…आमदार शिरसाटांचा हल्लाबोल

राज्यातील महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात होणार आहेत. स्वतः देवेंद्र फडणवीस पुण्यात जातीने लक्ष घालणार असल्याचे ते म्हणाले. त्यासाठी पक्षाची संघटनात्मक ताकद कशी वाढेल यावर प्रत्येक कार्यकर्त्याने लक्ष देण्याच्या सूचनादेखील करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

धमकीचा फोन! आमदार खोसकर रडत रडत म्हणाले…यांच्या हातून मरण्यापेक्षा मी आत्महत्या…

दरम्यान, महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. 9 मे नंतर न्यायालय उन्हाळी सुट्टीवर जाणार आहे, त्यामुळे 9 मे पुर्वी न्यायालयाने निकाल दिला तरच ऑक्‍टोबरमध्ये निवडणुक होण्याची शक्‍यता आहे. असं विधान नुकतेच पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यानंतर आज पुन्हा भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनेच तीच तारीख दिल्याने लवकरच महापालिका निवडणूक लागण्याची शक्यता आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube