Pune Loksabha : मेधा कुलकर्णी यांनाही व्हायचंय खासदार; भाजपच्या निर्णयाकडे लक्ष

  • Written By: Published:
Pune Loksabha : मेधा कुलकर्णी यांनाही व्हायचंय खासदार; भाजपच्या निर्णयाकडे लक्ष

विष्णू सानप

Medha Kulkarni Interested For Kasaba Bypoll Election :  पुण्याचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. यामुळे पुणे लोकसभा पोटनिवडणूक लवकरच जाहीर होऊ शकते. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांनी ‘लेट्सअप मराठी’शी बोलताना पुणे लोकसभा पोट निवडणुकीसंदर्भात आपली प्रतिक्रिया दिली आहे. पक्षाने संधी दिली तर मी पुणे लोकसभा लढवण्यासाठी तयार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

अजितदादांनी फटकारताचं राऊत बॅकफुटवर म्हणाले; ते मुख्यमंत्री…

मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, आतापर्यंत पक्षाने जी जबाबदारी मला दिली ती मी चांगल्या पद्धतीने पार पाडली आहे. आता पक्षाने काही जबाबदारी दिली तर तीदेखील मी पार पाडण्याचा प्रयत्न करेन. लोकसभेसाठी माझं नाव चर्चेत आहे. हे खरं आहे. पक्षाने संधी दिली तर, मी निश्चितच पुणे लोकसभा लढवण्यासाठी तयार आहे, अशी प्रतिक्रिया मेधा कुलकर्णी यांनी दिली आहे.

‘145 आमदार असतील तर त्यांनी’.. अजितदादांच्या ‘त्या’ वक्तव्यावर पटोलेंचा टोला

गिरीश बापट यांचं निधन झाल्यानंतर भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून लोकसभा पोटनिवडणूक लढवण्याची जाहीर इच्छा व्यक्त केल्या जात आहेत. यामध्ये बापट यांच्या निधनानंतर काहीच दिवसानंतर पुणे भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांचे भावी खासदार म्हणून बॅनर झळकले होते. नुकतीच बालगंधर्व रंगमंदिर येथे गिरीश बापट यांची शोकसभा झाली. यावेळी गौरव बापट यांनीदेखील पुढील समीकरणे काय असतील हे आम्हाला माहीत नाही. मात्र, जनतेने आम्हाला साथ द्यावी आणि मार्गदर्शन करावं असं आवाहन करून सूचक विधान केले होते. त्यांचे हे विधान बापट कुटुंबीय एकप्रकारे लोकसभेसाठी तयार असल्याचं अप्रत्यक्ष सूचित करण्यासारखे आहे.

मराठा आरक्षणावर विखे पाटलांचे मोठे विधान; म्हणाले, सरकार आरक्षणाबाबत अत्यंत..

तर, दुसरीकडे भाजप खासदार संजय काकडे यांचीही लोकसभा लढवण्याची इच्छा काही लपून राहिलेली नाही. आता या स्पर्धेत मेधा कुलकर्णीही उतरल्याने पुणे लोकसभेसाठी भाजपमध्ये रस्सीखेच पाहायला मिळू शकते. त्यामुळे आता पुणे लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचा उमेदवार कोण असेल? कोणाला उमेदवारी द्यावी? हा पेच भाजप श्रेष्ठींपुढे निर्माण झाला आहे. कसबा पोटनिवडणुकीमध्ये भाजपने आपला उमेदवार जाहीर करत असताना कमालीचा सस्पेन्स ठेवत टिळक कुटुंबीयांना डावलत अखेरच्या क्षणी हेमंत रासने यांची उमेदवारी घोषित केली होती. तसाच प्रकार पुणे लोकसभा पोटनिवडणुकीतही पाहायला मिळेल का? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

Mamata Banerjee : जीव देईल पण देशाची फाळणी होऊ देणार नाही!

ताकद लावूनही कसब्यात पराभव

दरम्यान, कसब्यात पक्षाने सर्व ताकद लावून देखील पराभव झाल्याने पुणे लोकसभा पोटनिवडणुकीतील उमेदवार भाजपकडून फार विचार करून दिला जाईल, असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. गेल्या निवडणुकीत टिळक कुटुंबीयांना डावलण्यात आल्याने तसेच 2019 ला कोथरूड विधानसभा मतदारसंघातून मेधा कुलकर्णी इच्छूक असूनही त्यांच्याऐवजी चंद्रकांत पाटील यांना तिकीट देण्यात आले होते. यामुळे ब्राह्मण समाजाच्या मतदारांच्या रोषाचा भाजपला कमालीचा सामना करावा लागत आहे. ती चूक यावेळी भाजपकडून होणार नाही आणि बापट कुटुंबियांनाच पुणे लोकसभेचे तिकीट दिले जाईल किंवा त्याऐवजी नाराज मेधा कुलकर्णी आणि ब्राह्मण समाजाची एकाच वेळी समजूत काढली जाईल. त्यासाठी मेधा कुलकर्णी यांचा या खासदारकीसाठी विचार होऊ शकतो, अशा चर्चा राजकीय क्षेत्रात जोर धरू लागल्या आहेत.मात्र, भाजप धक्कातंत्र वापरण्यात माहीर असल्याने ऐनवेळी ते कुठला डाव टाकतील आणि कुणाची उमेदवारी जाहीर करतील हे काही सांगता येत नाही.

देशात आज लोकसभा निवडणुका झाल्यास कोण सत्ता राखणार? सर्व्हेतून समोर आली नवी माहिती

पुणे जिल्ह्यात 21 विधानसभा मतदारसंघांपैकी एकही मतदारसंघ ब्राह्मण उमेदवाराकडे नसल्याने ब्राह्मण समाजाची भाजपवर नाराजी आहे. यामुळे एकाच वेळी ब्राह्मण समाज अन् मेधा कुलकर्णी यांची नाराजी दूर करण्यासाठी कुलकर्णी यांची पुणे लोकसभेची लॉटरी लागू शकते, आशाही चर्चा राजकीय वर्तुळात जोरात सुरू आहेत. दरम्यान, महाविकासआघाडी मध्ये पुणे लोकसभेची जागा ही काँग्रेसकडे आहे. मात्र, या जागेवर राष्ट्रवादीकडून दावा करण्यात येत असून राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचे नाव पुढे आलं आहे तर काँग्रेसकडून आपणच ही जागा लढणार असल्याचं स्पष्ट करण्यात आला आहे. आता पुणे पोटनिवडणूक कधी लागणार आणि लागली तर ती निवडणूक होणार की बिनविरोध होणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube