पुणे पोलीस कमिशनरच्या एका आदेशाने DJ चा आवाज कायमचा बंद होणार?
Pune Ganeshotav 2026 DJ पुण्यात डीजे बंदी न होण्यामागे राजकीय गणित काय? डीजे बंदी पुण्यात न होता सोलापूरात कशी घडली जाणून घेऊ सविस्तर...
Pune Ganeshotav 2026 Will sound of DJs be silenced forever by an order from the Pune Police Commissioner : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. ज्या शहरात कधीकाळी टिळकांनी इंग्रजांविरूद्ध एकत्र येण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. त्याच गणेशोत्सवाला आता बिभत्स रूप आलंय. डीजे आणि कर्णकर्कश ध्वनिक्षेपकांच्या वापराला आता थेट नागरीकांनीच विरोध सुरू केलाय. एकीकडे डीजेला विरोध करणाऱ्यांना धर्मिक कार्यक्रमांचं विरोधक मानलं जातय. दुसरीकडे सरकार आणि प्रशासन यावर कोणतीही ठाम भूमिका घेत नाहीये. मात्र ऐतिहासिक सजग नागरिकांच्या पुणे शहरात जे शक्य होतं नाहीये ते सोलापूरने मात्र शक्य करून दाखवलं आहे. त्यामुळे पुण्यात डीजे बंदी न होण्यामागे राजकीय गणित काय? तसेच डीजे बंदीची क्रांती पुण्यात न घडता सोलापूरात कशी घडली जाणून घेऊ सविस्तर…
पुण्यात ‘डीजे’च्या आवाजाचा मुद्दा तापला!
पुणे महानगरपालिकेने गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी गणेश मंडळांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांनी “गणेशोत्सवात डीजे आणि लाऊडस्पीकरवर पूर्णपणे बंदी घालावी, अशी आक्रमक भूमिका मांडली. त्यांच्या या मागणीनंतर बैठकीत उपस्थित असलेल्या काही गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी तीव्र आक्षेप घेतला आणि बापट यांना सभागृहाबाहेर काढण्याची मागणी केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या वादाला मोठे तोंड फुटले.
Maharashtra Cabinet Decisions : राज्य मंत्रिमंडळात 4 मोठे निर्णय; पुणेकरांना दिलासा
डीजेच्या अति तीव्र आवाजामुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळलेले पुणेकर एकत्र आले. जागरूक नागरिकांनी आणि पर्यावरण कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून डीजेविरोधात तीव्र निदर्शने केली. डीजेमुक्त गणेशोत्सवासाठी सुमारे ३० हजार नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांची ऑनलाइन याचिकाही प्रशासनाकडे दाखल करण्यात आली.
उपचारासाठी आलेल्या 19 वर्षीय तरुणीचा डॉक्टरकडून विनयभंग; कडा येथील हॉस्पिटलमध्ये खळबळ
या मुद्द्याला नंतर राजकीय स्वरूप आले आणि विविध पक्षांचे नेते आमनेसामने आले. यात पुण्यातील भाजप नेत्यांमध्येच यावरून दोन गट पडल्याचं पाहायला मिळत आहे. भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी असे म्हणत डीजेला विरोध दर्शवला. काँग्रेसनेही डीजेच्या दणदणाटामुळे लहान मुले व वृद्धांना होणाऱ्या त्रासाचा मुद्दा उचलला. तर भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे आणि काही गणेश मंडळांनी उत्सव निर्बंधमुक्त वातावरणात साजरा व्हावा अशी भूमिका घेतली. म्हणजे डीजेच्या परवानगी सह वापरावर ते ठाम आहेत.
लष्करप्रमुखांची दक्षिण कमांडला भेट; माजी सैनिकांचा ‘योद्धा सेवा सन्मान’ने गौरव
दरम्यान यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात भाजपच्या बैठकीत यावर भाष्य केले. त्यांनी पुणेकरांना डीजेच्या वादात न पडता संपूर्ण महाराष्ट्राला आदर्श ठरेल अशा पारंपरिक आणि सांस्कृतिक पद्धतीने उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. त्यांच्या डीजेला थेट कडक विरोध न करता केवळ अवाहन करण्याला फडणवीसांनी पुण्यातील डीजेचा प्रश्न टाळला की हुशारीने बाजू बदलली? भाजप डीजेच्या मुद्द्यावर बॅकफुट की डॅमेज कंट्रोल करत आहे. याचा संभ्रम मात्र कायम आहे.
सोलापूर डीजे मुक्त कसं झालं?
सोलापुरातही गणेशोत्सव, आंबेडकर जयंतीला डीजेचा दणदणाट होता. पण जेष्ठ पत्रकार व आंबेडकरी विचारांचे कार्यकर्ते सुनिल मानेंनी आंबेडकर जयंतीसारख्या अतिशय महत्वाच्या कार्यक्रमात डीजेबंदीची भूमिका मांडली. आधी लोकांनी विरोध केला पण नंतर त्याचं म्हणणं पटलं. यांनी दहा वर्षांपूर्वी कोणत्याच कार्यक्रमात, उत्सवात, जयंती-पुण्यतिथीत डीजे नको यासाठी याचिका केली. यामध्ये असीम सरोदे त्यांचे वकील होते. या याचिकेनंतर सोलापूरात विशेषतः डॉक्टर मंडळी एकत्र आली. ज्येष्ठ वकील धनंजय माने यांनी सही मोहीम, मिस्ड कॉल मोहीम, आंदोलनं केली. ENT तज्ज्ञांनी वेळोवेळी डीजे मुळे होणाऱ्या आरोग्यावरील परिणामांबाबत जागृती केली.
सोने खरेदी करू नका; PM मोदी पुन्हा-पुन्हा का सांगतायत?
या लोक चळवळील साथ मिळाली कर्तव्य दक्ष अधिकाऱ्यांची. 2025 गणपती विसर्जनापासून डीजेमुक्तीला सुरूवात झाली. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी DJ / लेझर लाईटवर बंदीचे आदेश काढले. त्याला शहरातल्या 1,148 सार्वजनिक गणेश मंडळांनी साथ देत DJ लावलाच नाही. फक्त 137 मंडळांनी मिरवणूक काढली, बाकीच्यांनी कमी खर्चात साधं विसर्जन केलं. ज्यांनी आदेश पाळले नाहीत त्यांच्या विरोधात थेट दंडात्मक कारवाई व गुन्हे दाखल केले. त्याचा परीणाम म्हणून असंख्य धार्मिक स्थळांनी स्वतःहून भोंगे काढून टाकले. दरम्यान अशाचं डीजे मुक्तीचं उदाहरण हैदराबादचंही आहे. जेथे पोलीस आयुक्तांनी एक ऑर्डर काढली आणि एका तासात सगळे डीजे बंद केले.
George Kovoor : जॉर्ज कोवूर पार्ले बिस्किट्सचे नवीन सीईओ; आजपासून स्वीकारणार सूत्रे
दुसरीकडे पुणे पोलिसांनी नियमभंग करणाऱ्या आणि तीव्र आवाजाच्या ‘प्रेशर-मिड’ किंवा ‘प्लाझ्मा’ सारख्या साऊंड सिस्टिम्स थेट जप्त करण्याची कडक भूमिका घेतली आहे. तसा अधिकार देखील पोलीस आयुक्त किंवा जिल्हाधिकारी यांना आहे की, ते कोणाच्याही पत्राची वाट न बघता हे करू शकतात. त्यामुळे कोणतेही लोकप्रतिनिधी पुणे पोलीस कमिशनरना काढायला लावू शकतात. यांच्या एका पत्रावर पुण्याचे पोलीस कमिशनर एक ऑर्डर काढून डीजेचा उन्माद एका तासात बंद करू शकतात. पण तेथील गणेश मंडळांनी राजकीय नेत्यांनीही त्याला साथ दिली तर पुणंही डीजे मुक्त होऊन देशासह राज्याला एक आदर्श घालवून देऊ शकतं.