Kishor Aaware murder case : किशोर आवारे खून प्रकरणी मोठी अपडेट, चौघांना 8 दिवसांची पोलीस कोठडी

  • Written By: Published:
Kishor Aaware murder case : किशोर आवारे खून प्रकरणी मोठी अपडेट, चौघांना 8 दिवसांची पोलीस कोठडी

Kishor Aaware murder case : तळेगांव दाभाडे येथील (Janseva Vikas Samiti) अध्यक्ष किशोर गंगाराम आवारे (Kishor Gangaram Aware) यांच्यावर शुक्रवारी दिवसाढवळ्या गोळीबार करण्यात आला. त्यात ते गंभीर जखमी झाले होते त्यांनतर त्यांचा मृत्यू झाला. आता याप्रकरणात एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. या खून प्रकरणी पुणे शहर पोलिस (Pune City Police) दलाच्या गुन्हे शाखेने चौघांना ताब्यात घेतलं आहे. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता 8 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

प्रविण उर्फ रघुनाथ धोत्रे Pravin alias Raghunath Dhotre, आदेश धोत्रे (Adesh Dhotre), शाम निगडकर (Shyam Nigadkar) (रा. तळेगाव) आणि नाना उर्फ संदीप विठ्ठल मोरे Nana Alias Sandip Vittal MOre (40, रा. पंचतारामनगर, संभाजी चोक, गणेशमंदिराजवळ, आकुर्डी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

दरम्यान किशोर आवारे यांची शुक्रवारी भरदुपारी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या (Talegaon Dabhade Municipal Council) समोर गोळया घालून आणि कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. विशेष म्हणजे मारेकरी कोयत्याने वार करीत असलेले व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. किशोर आवारे यांच्या खून प्रकरणामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

KRK : राहुल हे भारतीय जनतेचे सर्वात आवडते राजकारणी याचा ‘हा’ पुरावा

किशोर आवारे खून प्रकरणातील संशयित नाना उर्फ संदीप मोरेसह इतर तिघांची माहिती पथक-2 च्या पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांना मिळाली होती. पोलीस पथकाने तातडीने सापळा रचुन नाना उर्फ संदिप मोरेला अगोदर ताब्यात घेतले नंतर तिघांना अटक करण्यात आली. त्यांना आज न्यायालयात हजार करण्यात आले असता 8 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube