Pune : पुणे महापालिकेचे बजेट सादर; वाचा कुणासाठी किती सवलती?
पुणे महानगर पालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी २०२३_२०२४ चे साठीचे ९५१५ कोटी रुपयांचे बजेट मांडले आहे. मागील वर्षीपेक्षा यंदाच्या बजेट मध्ये ९२३ कोटींची भर घालण्यात आल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात सर्वाधिक तरतूद पाणीपुरवठ्यासाठी करण्यात आली असून १३२१ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले आहे.
शहरातील मलिनिसरणसाठी ८१२ कोटी रुपये तर घनकचरा व्यवस्थापनसाठी ८४६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. यसाह वाहतूक नियोजन व प्रकल्पसाठी ५९० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. याचबरोबर पुण्यातील रस्त्यासाठी ९९२ कोटी रुपयांची तरतूद तर पी एम पी एल साठी ४५९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यामागे मोठे कटकारस्थान; पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप
पुणे शहरातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणासाठी ४६८ कोटी रुपये व आरोग्यासाठी ५०५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तर नियमित मिळकत कर भरणाऱ्याना पुणे महानगर पालिका बक्षीस जाहीर करणार आहे. यासाठी १ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर नागरिकांना दिलासा म्हणून मिळकर आणि पाणीपट्टी दरांमध्ये कुठलीच वाढ करण्यात आलेली नाही.
वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुण्यात ८ नवीन उड्डाणपूल उभारण्यात येणार आहेत. यावेळी नव्याने समाविष्ट 23 गावांसाठी विशेष तरतूद देखील करण्यात आलेली आहे. यातील पगार आणि पेन्शन वर सुमारे ३१०० कोटी खर्च होणार आहेत.
हुकूमशाहीच्या अंताची ही सुरुवात; राहुल गांधींवरील कारवाईवर ठाकरेंची प्रतिक्रिया
पुण्यात महत्त्वाचे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. पुण्यात कचऱ्यापासून हायड्रोजन प्रकल्प उभारणार, वारजे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,सिंहगड रोड उड्डाणपूल, नदी पुनर्जीवन प्रकल्प होणार, डॉग पार्क, हायड्रो ऊर्जा प्रकल्प, चार्जिंग स्टेशन उभारणे आदींचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले आहे. याचबरोबर श्वान प्रेमींसाठी पुण्यात डॉग पार्क उभारण्यात येणार आहेत. तसेच शहरात फेरीवाले यांच्यासाठी देखील हॉकर्स प्लाझा, पार्क उभी करणार असल्याचे आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले आहे.