राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यामागे मोठे कटकारस्थान; पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप

राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यामागे मोठे कटकारस्थान; पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप

Prithviraj Chavan : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द करण्याच्या निर्णयानंतर देशाच्या राजकारणात वादळ उठले आहे. या निर्णयानंतर विरोधी पक्ष सरकारवर अक्षरशः तुटून पडले आहेत. काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घणाघाती टीका केली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लोकशाहीला धक्का देणाऱ्या या निर्णयाचा धिक्कार केला आहे तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यामागे सरकारचे मोठे कारस्थान असल्याचा आरोप केला आहे.

सुरत न्यायालयाने राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्या शिक्षेविरोधात अपील करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली होती. संसदेच्या नियमानुसार शिक्षापात्र खासदाराला आपले पद गमवावे लागते. त्यानुसार लोकसभा सचिवालयाने त्यासाठीची अधिसूचना आज दुपारी जाहीर केली. राहुल गांधी हे केरळमधील वायनाड या लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत होते. या निर्णयानंतर आता भाजप विरुद्ध काँग्रेस असा मोठा संघर्ष सुरू होणार असल्याची चिन्हे आहेत.

हे सुद्धा वाचा : राहुल गांधींची खासदारकी रद्द, अजित पवारांनी केला निर्णयाचा धिक्कार..

यानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, हे खरंतर सुडाचं राजकारण आहे. नरेंद्र मोदी राहुल गांधींच्या वाढत्या लोकप्रियतेला घाबरलेले आहेत. देशात अघोषित आणीबाणी आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. राहुल गांधींना चांगला प्रतिसाद मिळत आहे. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात नरेंद्र मोदी अपयशी ठरत आहेत. त्यामुळे त्यांच्या लोकप्रियतेत घट होत आहे.

ते पुढे म्हणाले, की काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधींना भारत जोडो यात्रेमुळे मोठी लोकप्रियता मिळाली आहे. पण, राहुल गांधींचा संसदेतील आवाज बंद करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. दोन वर्षांच्या शिक्षेची टांगती तलवार अजूनही राहुल यांच्या डोक्यावर आहे त्यात काय होईल माहिती नाही. पण, एका बाजूला शिक्षा करून  दोन वर्षांसाठी तुरुंगात डांबायचे. दुसरीकडे त्यांची खासदारकी रद्द करून आवाज दाबण्याचा प्रयत्न करायचा. ही पूर्णपणे सूड भावनेतून केलेली कारवाई आहे.

हुकूमशाहीच्या अंताची ही सुरुवात; राहुल गांधींवरील कारवाईवर ठाकरेंची प्रतिक्रिया

राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याचे प्रयत्न अनेक दिवसांपासून सुरू होते. कटकारस्थान रचून हा निर्णय घेण्यात आला, असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube