पुण्यात आज मेट्रो बंद! धुळवडीमुळे वाहतूक प्रशासनाचा निर्णय, सार्वजनिक ठिकाणी मोठी गर्दी

Pune Metro Services Closed From 6pm to 3 Dhulvad : राज्यभरात धुळवडीचा उत्साह दिसून येतोय. सर्वजण रंग खेळण्यामध्ये दंग आहेत. याच पार्श्वभूमीवर पुण्यातून एक मोठी बातमी समोर (Holi Festival Celebration) आलीय. पुण्यात धुळवड (Pune) मोठ्या जल्लोषात साजरी होते. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी मोठी गर्दी निर्माण होते. याच गर्दीच्या पार्श्वभूमीवर पुणे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. पुण्यात सकाळी 6 ते दुपारी 3 या वेळेत मेट्रो सेवा (Pune Metro Services) बंद ठेवण्यात येणार आहे.
पुणे वाहतूक प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेतलेला आहे. तसेच नागपुरात देखील मेट्रो काही काळ बंद ठेवण्यात येणार आहे. तर राज्यात सर्वत्र तरूणाई रंग खेळण्यात व्यस्त आहे. कोरड्या रंगांसोबत अन् गुलालासोबत होळी (Dhulvad) खेळताना यावेळी दिसत आहेत.
वोट जिहाद प्रकरण, मुफ्ती इस्माईल सभागृहात भडकले, किरीट सोमय्यांवर हल्लाबोल
राज्यात ठिकठिकाणी नागरिक धुलिवंदनाचा आनंद लुटत आहेत. मु्ंबईसह इतर जिल्ह्यांमध्ये देखील होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतोय. तर काल होलिका दहन पार पडले. त्यानंतर आज सर्वजण धुलिवंदन खेळत आहेत. काही ठिकाणी रंगपंचमीला रंग खेळले जातात, तर अनेक बॉलिवूड अन् मराठी कलाकार देखील रंग खेळत असल्याचं पाहायला मिळतंय.
धुलीवंदनामुळे आज नागपूर मेट्रो देखील तीन वाजेपर्यंत बंद राहणार आहे. साताऱ्यात दरवर्षी अंधश्रद्धा निर्मूलन समिती ग्रामीण भागामध्ये एक उपक्रम राबवत असते. होळीची पोळी करू दान, असं या उपक्रमाचं नाव आहे. पुरणाचा नैवेद्य होळीत न टाकता अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते गोळा करून गरीब लोकांमध्ये वाटप करतात.
मुंबई-अमरावती रेल्वेचा मोठा अपघात; ट्रकने जोरदार धडक दिल्याने घडली घटना
तर दुसरीकडे धुलिवंदनाच्या निमित्ताने मटण दुकानांवर नागरिकांची मोठी रांग लागली आहे. चिकन आणि मटनच्या मागणीत देखील मोठी वाढ झालीय. पिंपरी चिंचवडमध्ये देखील हीच परिस्थिती आहे. त्यामुळे मटण अन् चिकनच्या दरांत मोठी वाढ झालीय. सकाळपासूनंच लोक चिकन-मटण खरेदीसाठी दुकानात गर्दी करताना दिसत आहे.