पुण्यात टोळीयुद्ध संपेना! वनराज आंदेकर खुनातील आरोपीच्या भावाची हत्या…
पुण्यात माजी नगरसेवक वनराज आंदेकर खूनातील आरोपीच्या भावाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना घडलीयं.
Pune news : पुण्यातील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर (Vanraj Aandekar Murder) खून प्रकरणातील आरोपीच्या भावाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना घडलीयं. भर रस्त्यावरच ही हत्या घडल्याने एकच खळबळ उडालीयं.
Medicine Dealer Strike :ऑनलाईन औषध विक्रीवर बंदी घाला! देशभरातले ‘केमिस्ट’ आज संपावर…
बालाजी नगर येथे ही धक्कादायक घटना घडली. भर दिवसा ही हत्या करण्यात आलीये. टोळी युद्धातून खून झाल्याची माहिती मिळत आहे. बालाजी नगर बस स्टॅन्ड येथे खून झाल्याची माहिती समोर आली आहे. भर चाैकात ही हत्या करण्यात आली. आंदेकर आणि कोमकर टोळी युद्धातून चौथी हत्या झाली. हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव अक्षय ऊर्फ बाळा म्हस्के आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक माहितीनुसार, ही हत्या टोळी युद्धातून करण्यात आली. पोलिसांकडून या प्रकरणात प्राथमिक तपास सुरू करण्यात आला. आता भर चाैकात भर दिवसा टोळी युद्धातून ही हत्या झाली. आंदेकर याचे कुटुंबिय सध्या जेलमध्ये आहेत. त्यामध्येच पुन्हा एकदा पुण्यात टोळी युद्ध सुरू झाले. या हत्येच्या घटनेनंतर लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
दरम्यान, 2025 साली पुण्यातील गणेशपेठ परिसरात बंडू आंदेकर याचा मुलगा आणि माजी नगरसेवक याची टोळक्याकडून हत्या करण्यात आली होती. गोळ्या झाडून आणि कोयत्याचे वार करुन बंडू आंदेकरची हत्या करण्यात आली होती. या हत्येमध्ये वनराज आंदेकर याची बहीण आणि मेहुण्याचा सहभाग होता. तेव्हापासून आंदेकर टोळीने वनराजच्या हत्येचा बदला घेण्यासाठी कोमकर टोळीतील एकेकाला संपवायला सुरुवात केली होती.
काही महिन्यांपूर्वीच वनराज आंदेकरच्या बहिणीचा मुलगा आयुष कोमकर याची घराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर कात्रज घोलेवाडी भागात कोमकर टोळीतील शिंदे नावाच्या व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. हादेखील वनराज आंदेकर हत्याप्रकरणातील आरोपीचा भाऊ होता. त्यानंतर आज पुन्हा एकदा बालाजी नगर परिसरात वनराज आंदेकर प्रकरणातील आरोपीच्या भावावर गोळ्या झाडण्यात आल्या.