पुणे दौऱ्यातील राखीव वेळेत मोदींनी काय केले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज नियोजित पुणे दौरा होता. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. त्यानंतर दुपारी राखीव वेळेत पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्यासह माजी आमदार डॉ. अरविंद लेले, आरएसएसचे मदनदास देवी, यांच्या कुटुंबियांची आणि जुने सहकारी मुकूंद कोंढवेकर यांची भेट घेतली आहे.
कार्यक्रमात अजित पवार शरद पवारांच्या मागून का गेले? दादांनी सांगून टाकलं
या भेटीदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेत्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलं आहे. भेटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. भेटीदरम्यान, माजी आमदार अरविंद लेले यांच्या कुटुंबियांचीही भेट घेतलीयं. भेटीत लेले कुटुंबियांनी ‘हिंदू सारा एक’ या गीताची फ्रेम मोदी यांना भेट दिली. तर पीएम केअर फंडासाठी 2 लाख रुपयांचे समर्पण दिले आहेत.
निवडणुकीत अजितदादा कुणाचा प्रचार करणार? भुजबळांनी दिलं भाजपला टोचणारं उत्तर
मदनदास देवी यांच्या कुटुंबियांची भेट :
पंतप्रधान मोदींनी पुणे दौऱ्यादरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते मदनदास देवी यांच्या कुटुबियांचीही भेट घेतली आहे. मदनदास देवी यांनी वयाच्या 25 व्या वर्षी त्यांनी घर सोडत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी संपूर्ण आयुष्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा देशात प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यांनी संपूर्ण देश पिंजून काढला होता. मदनदास देवी यांचं 24 जुलै रोजी निधन झालं. त्यानंतर आजच्या पुणे दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कुटुंबियांनी भेट घेऊन सांत्वन केलं आहे.
मुकुंद कोंढवेकरांची घेतली भेट :
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जुने सहकारी मुकुंद कोंढवेकरांचीही पंतप्रधान मोदींनी भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान, गीता धर्म मंडळाच्या शतक महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान मोदींनी उपस्थित राहण्यासाठी मुकुंद कोंंढवेकरांनी मोदींनी निमंत्रण दिलं आहे.