शाळेतून येताना तिघांनी घेरले…पुण्यात रेल्वे स्टेशन, बसमध्ये तोच अनुभव ; तरुणीने राहुल गांधींसमोर मांडली व्यथा…

Rahul Gandhi: पालघरमधील वसई येथील असलेल्या व सध्या पुण्यात शिक्षण घेत असलेल्या सुचित्रा हिने आलेले वाईट अनुभव राहुल गांधी यांच्यासमोर मांडले

  • Ashok Parude
  • Written By: Published:
Rahul Gandhi Pune Girls

Rahul Gandhi Pune Chhatro ki Gunj : काँग्रेसचे नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी छात्रों की गूंज (Chhatro ki Gunj ) या पुण्यातील कार्यक्रमात तरुणींशी संवाद साधला. अनेक तरुणींनी पुढे येऊन आपल्या अडचणी मांडल्यात. पालघरमध्ये असताना छेडछाड झाली आणि पुण्याला आलेल्या उच्च शिक्षण घेत असताना अनेकदा तसेच घडले, असे त्या तरुणीने जाहीरपणे सांगितले.


‘महिलांनी स्वतंत्र राहू नये, हा मनुस्मृतीचा डाव’; पुण्यात राहुल गांधींचा हल्लाबोल

पालघरमधील वसई येथील असलेल्या व सध्या पुण्यात शिक्षण घेत असलेल्या सुचित्रा हिने आलेले वाईट अनुभव राहुल गांधी यांच्यासमोर मांडले. पंधरा वर्षापूर्वी मी आठवीमध्ये होते. पाच किलोमीटर दूर शाळेत चालत जात होते. एके दिवशी सायंकाळी शाळा सुटल्यानंतर घरी येत होते. रस्त्यात चौकात तीन तरुण उभे होते. दारू पिलेले होते आणि लग्न झालेले. ते जवळच्या गावातील तरुण होते. माझ्याबरोबर माझी मैत्री होती. त्या तरुणांनी आम्हाला छेडले, कमरेला हात लावला. मी घाबरलेली होती. त्यानंतर मी पळून गेले. माझी मैत्रीण पळून गेले. हे मी माझ्या वडिलांना सांगितले. तक्रार करण्यासाठी पोलिस स्टेशनला वडिलांनी आईबरोबर जायला सांगितले होते. आईने पोलिस स्टेशला तक्रार दिली. पोलिसांनी त्या तरुणांना खूप मारले. परंतु गाव माझ्याविरोधात उभे राहिले. तिला शिकवू नका, इज्जत गेली आहे, असे गावातील लोक म्हणत होते. परंतु वडिल पाठीमागे उभे राहिले शिक्षण दिले आणि पुण्याला पाठविले.


देशात दरवर्षी 4.50 लाख स्त्रीभ्रूण हत्या; ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमात राहुल गांधी नेमकं काय म्हणाले?


पुण्यात दोन वेळेस वाईट अनुभव

ही तरुणी 2022 ला पुण्यात उच्च शिक्षणासाठी आली. ती एम. ए. अर्थशास्त्रात शिक्षण घेत आहे. लायब्ररीतून होस्टेलमध्ये येत असताना पीएमपीएल बसमध्ये गर्दी होती. ती बसमध्ये खाली पडत असताना एका मुलाने हात पकडून तिला सावरले. पाठीमागे एक महिला उभी होती आणि मुलीच्या पाठीमागे तो मुलगा उभा राहिला. त्या मुलाने माझ्या कमरेला हात लावून मागे खेचले. त्यानंतर तरुणी पाठीमागे होऊन तरुणाच्या कानाखाली लगावली. वाईट अनुभवानंतरही बसमधील तरुणी काहीच बोलल्या नाहीत, असे या तरुणीने सांगितले. रेल्वेने वसईतून पुण्यात आल्यानंतर रेल्वे स्टेशनलाही एका दारुड्याने छेडले होते. त्याला तिथेत मारले. तिथे महिला, तरुणीही होत्या. परंतु कोणी काहीच बोलल्या नाहीत. एखाद्या मुलीला, महिलेला छेडत असतील ते रोखले पाहिजे. त्यासाठी महिला, पुरुषांना सपोर्ट केला पाहिजे, असेही त्या तरुणीने सांगितले.

follow us