वळसेंना मंत्री करताच आमदार मोहितेंचा हल्लाबोल… अजितदादा गटात धुमशान सुरू
Dilip Mohite on Dilip Walse_ पुण्यातील खेडचे आमदार दिलीप मोहिते हेही अजित पवारांच्या बंडात सहभागी झाले आहेत. ते अजित पवारांच्या बैठकीला, शपथविधीला उपस्थित होते. परंतु दिलीप वळसे पाटील यांना मंत्री केल्याने आमदार दिलीप मोहिते हे चिडले आहेत. त्यांनी वळसे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अजित पवारांबरोबर राहणार का ? याबाबत अद्याप स्पष्ट भूमिका त्यांनी जाहीर केलेली नाही. मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याचे त्यांनी लेट्सअपशी बोलताना स्पष्ट केले. (khed-mla-dilip-mohite-slam-dilip-walse-patil)
अजित पवार यांनी महत्त्वाचे काम आहे, असे सांगून मुंबईला बोलून घेतले. आगामी काळात अधिवेशन असल्याने सकाळी नऊ वाजता मुंबईत पोहोचलो होतो. तोपर्यंत कसलीच कल्पना नव्हती. शंकाही आली नव्हती. त्यानंतर आणखी काही आमदार आले. नेते मंडळी आली होती. सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, रामराजे निंबाळकर आले होते. पक्षाचे विषय आले नाहीत. अजित पवार व इतर जण मंत्रिमंडळात शपथ घेतील, याची कुठलेही कल्पना नव्हती, असे आमदार दिलीप मोहिते यांनी सांगितले.
अजित पवार सत्तेत येताच शिंदेंच्या अडचणी वाढल्या, मुख्यमंत्री काय भूमिका घेणार?
आमदार मोहिते यांनी वळसे यांना मंत्री केल्यावरून जोरदार टीका केली. मोहिते म्हणाले, पवारसाहेबांनी ठरविक लोकांवर प्रेम केले आहे. त्यांच्यावर विश्वास टाकला. तेच लोक पक्ष मोठा करतील म्हणून तेच लोक पुढे गेले आहेत. आता संधी देणारेच विरोधात गेले आहेत. सरपंच ते आमदार असा माझाही प्रवास आहे. लोकांशी आमची नाळ जोडलेले आहे.
दिलीप वळसे मला पसंत नाहीत. वळसेंविरोधात भूमिका स्पष्ट केली आहे. काल विरोध होता. आजही विरोध आहे. मी त्यांच्या मंत्रिपदाला विरोध केला आहे. पवारसाहेबांनी त्यांना मंत्री केले. आमचे काम केलेच नाही. त्यांनी आम्हाला त्रासच दिला आहे. तसेच अजित पवारही हेच करित असल्याचेही मोहिते यांनी म्हटले आहे.
‘त्या’ किटी पार्टीला पवारांचं अध्यक्षपद मान्य मात्र पटेल-तटकरेंवरील कारवाई नाही; आव्हाडांचा हल्लाबोल
सरपंच ते आमदार माझा प्रवास आहे. माझ्यामागे राजकीय वारसा नव्हता. राजकीय वारसा त्यांच्या मागे होता. त्यांना संधी मिळाली. ते तळागळातून आले असते तळ्यागळ्यातील समस्या कळल्या असत्या. कार्यकर्त्यांतून आम्ही आलो असल्याचाही टोलाही मोहिते यांनी लगावला आहे. ज्यांना मंत्रिपद मिळाले त्यांच्या तालुक्याचा विकास झाला. आम्हाला तालुक्याच्या विकासाची संधी मिळाली नाही. अजित पवारांमुळे मतदारसंघात काम करण्याची संधी मिळाली आहे. वळसे हे मंत्री झाल्यावर ते आमच्यासाठी काय करणार असा सवाल मोहिते यांनी उपस्थित करत वळसे यांना शंभर टक्के माझा विरोध असल्याचे म्हटले आहे.
मंत्रिपद मिळाले नाही म्हणून माझाविरोध नाही. ज्यांच्यामुळे आम्हाला त्रास झाला आहे. त्यांच्यासाठी आम्ही सगळे करायचे आहे का ? बाजूला जाण्याची माझी मानसिकता सगळ्या घटनेमुळे मी अस्वस्थ आहे. मी व आमदार अशोक पवारांनी अजित पवारांना हे सांगितले आहे. परंतु ते जुळवून घ्या, असे म्हणत आहे. पण आमचे जमवून घेणे अवघडच असल्याचे मोहिते यांनी सांगितले.