Sharad Pawar यांनी झटकले हात : मला धनुष्यबाणाच्या वादात पडायचे नाही

Sharad Pawar यांनी झटकले हात : मला धनुष्यबाणाच्या वादात पडायचे नाही

पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या दोन गटातील संघर्ष सुरु आहे. त्याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. त्यातच केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव तसेच धनुष्यबाणाचे चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिले आहे. त्यामुळे मोठा संघर्ष सुरु झाला आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष (NCP) शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपण धनुष्यबाणाच्या वादात पडणार नसल्याचे सांगितले.

धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव मिळाल्याने एकनाथ शिंदे गटामध्ये आनंदाचे वातावरण आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या गटामध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांत हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला धनुष्यबाण हे चिन्ह दिले आहे. असा प्रश्न शरद पवार यांना विचारला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. ते म्हटले मी कालच सांगितले आहे. जे सध्या सुरु आहे. त्या वादात पडणार नाही. त्यामुळे सध्या राज्यात एवढ्या मोठ्या घडामोडी घडत असताना राजकारणाचा दीर्घ अनुभव असलेले शरद पवार मात्र त्यापासून दूर राहणे पसंत करत आहे. तसेच प्रतिक्रिया देणास टाळाटाळ करत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube