Shreemant Dagdusheth Halwai Ganpati : सुर्यफुलांच्या अभिषेकाने गणरायाच्या चरणी वसंत बहरला

Shreemant Dagdusheth Halwai Ganpati : सुर्यफुलांच्या अभिषेकाने गणरायाच्या चरणी वसंत बहरला

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध अशा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला विविध सणांच्या ऋतुंच्या निमित्ताने आकर्षक सजावट करण्यात येत असते. त्यामध्ये कधी फळ, पदार्थ तर कधी फुलांची आरास या गणरायाला केली जाते. चैत्र महिन्यात वसंत ऋतू मध्ये विविध फुलांना बहर येत असतो. त्यातीलच एक असलेल्या सूर्यफुलांचा अभिषेक श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला करण्यात आला. मंदिराच्या कळसापासून ते गाभाऱ्यापर्यंत तब्बल 21 हजार सूर्यफुलांची आरास करण्यात आली होती.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती आणि सकाटा सीड इंडिया प्रा.लि. कंपनीच्या वतीने गणरायाला सूर्यफुलांची आरास करण्यात आली होती. तर पहिल्यांदाच अशा प्रकारे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदीरात मंदिराच्या कळसापासून ते गाभाऱ्यापर्यंत तब्बल 21 हजार सूर्यफुलांची आरास करण्यात आली होती. सकाटा सीड इंडिया प्रा.लि. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. जय सिंग यांनी विशेष सहकार्य मिळलं.

महावीर जयंती; जाणून घ्या, भगवान महावीरांची तत्त्वे आणि महत्व

या सजावटीमध्ये वापरण्यात आलेल्या सूर्यफुलांमध्ये तेलबिया नसून या फुलांचा वापर केवळ सजावटीसाठी केला जातो. फुलांच्या पाकळ्यांचा रंग गडद भगवा असून मध्यभाग काळा आहे. ही फुले दिसायला खूप आकर्षक असून शेतातून काढल्यानंतर ७-८ दिवस पाण्यामध्ये व्यवस्थित राहतात. मंदिराच्या कळसावर लावण्यात आलेल्या फुलांवर पडलेल्या सूर्यप्रकाशामुळे ही फुले अधिकच उठून दिसत होती. भाविकांनी ही आरास पाहण्यासोबतच हे दृश्य आपल्या मोबाईलमध्ये टिपण्याकरिता मोठी गर्दी केली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube