‘ऐसी शादी जो होने वाली नहीं हैं…’ सिया गोयलच्या स्नॅपचॅट मॅसेजेसमुळे केतन अग्रवाल हत्याकांडात नवा ट्विस्ट
Ketan Aggarwal Murder Case प्रकरणात मुख्य आरोपी सिया गोयलच्या स्नॅपचॅट मॅसेजेसमुळे केतन अग्रवाल हत्याकांडात नवा ट्विस्ट आला आहे.
Siya Goyal’s Snapchat Messages Give New Twist In Ketan Aggarwal Murder Case : पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मुख्य आरोपी सिया गोयलच्या स्नॅपचॅट मॅसेजेसमुळे केतन अग्रवाल हत्याकांडात नवा ट्विस्ट आला आहे. यामध्ये धक्कादायर माहिती समोर आल्याने हा खून एक पूर्व नियोजित कट असल्याचं बोललं जात आहे.
सिया गोयलच्या स्नॅपचॅट मॅसेजेसजमध्ये नेमकं काय?
समोर आलेल्या माहितीनुसार सियाचे समोर आलेले स्नॅपचॅट मॅसेजेस हे 25 मे चे असल्याचे बोलले जात आहे. ज्यामध्ये ती एका व्यक्तीशी तिच्या लग्नाला येण्याच्या बाबतीत बोलत आहे. तिचं लग्न राजस्थानमध्ये एक डेस्टीनेशन वेडिंग होणार होतं. ज्यासाठी प्रायव्हेट जेट बुक केलेलं असल्याने पाहुन्यांना त्यांचे आधीर कार्ड मागितले जात होते. त्यात सिया समोरील व्यक्तीला म्हणते की, आधार कार्ड फ्रंट बॅक भेज दे. लग्नाचे तिकीट काढण्यासाठी जे होणारच नाहीये. तरी देखील पाठवं.
आता फोनमध्येच सेव्ह होणार डिजिटल स्वाक्षरी; ‘Signatures’ ॲप काय?
दुसरीकडे या प्रकरणामध्ये पोलिसांना मोठा धक्का बसला असून दोन्ही मुख्य आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्याचे आदेश वडगाव मावळ न्यायालयाने दिले आहे. आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरीला 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज त्यांची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना वडगाव मावळ न्यायालयात हजर करण्यात आले होते. आज झालेल्या सुनावणीत पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी दोन्ही आरोपींना पोलीस कोठडीची मागणी केली होती मात्र न्यायालयाने ही मागणी फेटाळून दोन्ही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.